देवराष्ट्रे येथे वीज बिलांची होळी करून निषेध0 मिनिटे
देवराष्ट्रे (सदानंद माळी): आज देवराष्ट्रे येथे रीडिंग न घेता दिल्या गेलेल्या अन्यायी वीज बिलांची होळी करून शेतकरी व छोट्या उद्योजकांनी तीव्र निषेध नोंदवला.
तसेच, ही अन्यायकारक वीज बिले जर रद्द केली गेली नाहीत तर असंतोष तीव्र स्वरुपात व्यक्त करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी देवराष्ट्रे परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थीत होते.
अलीकडेच ग्राहकांच्या मीटर चे रीडिंग न घेता सरासरी काढून वीज बिले देण्याचे प्रमाण वाढले आहे व यात मनमानी पद्धतीने मीटर रीडिंग घेतले जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
संबंधित ग्राहकांना बोलावले जाऊन दरवेळी अचूक रीडिंग घेऊन बिले देण्यात यावीत अशी व्यवस्था शासनाने पुढे येवून करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जाहिरात:
आमच्या वेबसाईट वर जाहिरात देवून डिजिटल क्रांतीचा फायदा घ्या. आपल्या व्यवसाय, सेवा, उत्पादने पोचवा कडेगाव-पलूस परिसरातील ग्राहकांकडे. जाहिरातीच्या दरांसाठी संपर्क करा ९८१९१७९३७७