शेतकरी कर्जमाफी त्वरित व्हावी : कडेगाव युवासेनेची मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : त्वरित शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने वेगात पाऊले उचलावीत यासाठी कडेगाव येथे तहसीलदारांना युवासेनेतर्फे लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती युवासेना शहरप्रमुख राहुल चन्ने  यांनी दिली.

आज युवासेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या एका गटासह कडेगाव तहसीलदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

कडेगाव तालुका हा दुष्काळी असून तालुक्यातील लहरी हवामानाच्या परिणामामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती तोट्यात असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला कर्जमाफीसाठी भाग पाडण्यात येईल असे  निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे.

या प्रसंगी युवासेना कडेगाव  सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व आश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

*विशेष उन्हाळी कार्यशाळा *

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा अयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

शेतकरी कर्जमाफी त्वरित व्हावी : कडेगाव युवासेनेची मागणी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
१२६ वी डॉ. आंबेडकर जयंती कडेगावमध्ये उत्साहात साजरी‎

‎कडेगांव (सागर वायदंडे): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती कडेगाव तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी

Close