शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे कडेगाव तहसीलदारांना निवेदन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : त्वरित शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने वेगात पाऊले उचलावीत यासाठी कडेगाव येथे तहसीलदारांना तालुका शिवसेनेतर्फे लेखी निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती कडेगाव तालुका प्रमुख सुभाष मोहिते यांनी दिली.

शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या एका गटासह कडेगाव तहसीलदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनामध्ये शेतकऱ्याचा सात बारा उतारा कोरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच इतर मागण्याही करण्यात आल्या आहेत.

कडेगाव तालुका हा दुष्काळी असून तालुक्यातील लहरी हवामानाच्या परिणामामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती तोट्यात असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला कर्जमाफीसाठी भाग पाडण्यात येईल असे  निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे.

या प्रसंगी मुकुंद कुलकर्णी, राजू हेगडे, राहुल चन्ने, शंकर पवार, नितीन शिंदे, सुरेश मोहिते, सुनील मोहिते व शिवसेना कडेगाव तालुका  सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे कडेगाव तहसीलदारांना निवेदन

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरु

कडेगाव (सागर वायदंडे ): गेले दोन महिने कडेगाव-पलूस वनक्षेत्रपाल यांनी पगार मुद्दाम थकवल्याचे कारण देत आज योग्य कारवाई व्हावी यासाठी

Close