कडेगावमध्ये कायमस्वरूपी दारू दुकान बंदीची मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी): कडेगाव नगरपंचायत येथे घेण्यात आलेल्या विशेष सभेत येथील मुख्य बाजारपेठेतील भारती बझार समोरील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आला .

ऐन वेळच्या विषयामध्ये भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेता उदयकुमार देशमुख यांनी यासंदर्भात ठराव मांडला.

या ठरावास शौकत पटेल यांनी अनुमोदन दिले. साधक-बाधक चर्चेनंतर सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कडेगावमधील मुख्य बाजारपेठेत असणारे संबंधित दारूचे दुकान अलीकडच्या २२० मीटर पर्यंतच्या दारू दुकान बंदी निर्णयानुसार बंद करण्यात आले आहे.  परंतु, ते पुन्हा सुरु न करता कायमस्वरूपी बंदी करण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेवक देशमुख व भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. याची परिणीती म्हणून विशेष सभेत हा ठराव अखेर मंजूर करण्यात आला आहे.

हे दुकान गणपती मंदिराजवळ तसेच दवाखान्यांजवळ आहे, आणि सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरातील महिलांना त्रास होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत ही बाब कायमस्वरूपी दुकान बंदी करण्याची मागणी करणाऱ्या गटाने अधोरेखित केली आहे.

नगरसेवक उदयकुमार देशमुख यांनी दारू दुकान बंदीच्या निर्णयाची कडेगाव व परिसरामध्ये कठोर अंमलबजावणी व्हावी जेणेकरून परिसरातील महिलांना अनावश्यक त्रासास तोंड द्यावे लागणार नाही असे मागणी केली.

मंजूर झालेल्या ठरावाअन्वये पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी आवश्यक पत्रव्यवहार नगरपंचायतीने  करावयाचा आहे.

या ठरावमंजुरीबद्दल परिसरातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

 

कडेगावमध्ये कायमस्वरूपी दारू दुकान बंदीची मागणी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा कडेगावमध्ये संपन्न

कडेगाव (सागर वायदंडे) : श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आई डोंगराई महिला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आणि कडेगाव तालुका

Close