जनता क्रांती दलाच्या वतीने उद्या कडेगाव येथे मोर्चा: आकाश सातपुते0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): हिंगणगावमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाण व दगडफेकीत मातंग समाजातील काही तरूण मुले जखमी झाल्याच्या निषेधासाठी  व न्याय मागण्यासाठी जनता क्रांती दलाच्या वतीने उद्या (शुक्रवार दुपारी १:३० वाजता) मोर्च्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिली आहे.

उद्याचा मोर्चा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसिलदार कार्यालयपर्यंत  निघणार आहे. उद्या कडेगावचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने परिसरात आजूबाजूच्या गावातील लोकांची व व्यापाऱ्यांची गर्दी असते. या मोर्च्या संदर्भात कडेगाव पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालय यांना आयोजनासंबंधी निवेदन देण्यात आले आहे.

कडेगाव तालुक्यातील सर्व मातंग बौद्ध समाजातील तरूण मोठया संख्येने या मोर्च्यात सामील होणार असल्याचे क्रांती जनता दलाचे महाराष्ट्र उपध्याक्ष आकाश सातपुते यानी सांगितले. जनता क्रांती दलातर्फे तानाजी तुपे, संतोष पिसाळ, अजित पाटोळे हे मोर्चा आयोजनामध्ये आघाडीवर आहेत.


www.kplivenews.com


जाहिराती:

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 


 

जनता क्रांती दलाच्या वतीने उद्या कडेगाव येथे मोर्चा: आकाश सातपुते

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये कायमस्वरूपी दारू दुकान बंदीची मागणी

कडेगाव (प्रतिनिधी): कडेगाव नगरपंचायत येथे घेण्यात आलेल्या विशेष सभेत येथील मुख्य बाजारपेठेतील भारती बझार समोरील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद

Close