‘लिबर्टी’ च्या श्रीगणेशाची राज्यात डंका…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : मजबूत युवा संघटनातून आपल्या सामाजिक कार्याची परंपरा अबाधित राखणाऱ्या कडेगावच्या लिबर्टी गणेश मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. प्रसिद्ध मूर्तिकार राजेंद्र दीक्षित यांनी तयार केलेल्या ‘लिबर्टी’ च्या सुबक गणेश मुर्तीला तिसरा क्रमांक देवून गौरवण्यात आलंय. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान २०१६ मधे ‘लिबर्टी गणेश मंडळ, कडेगाव’ या मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्याबद्दल मुर्तिकार मा. राजेंद्र दीक्षित व  लिबर्टी गणेश मंडळ यांचा तृतीय क्रमांक देवून आज गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी कडेगावच्या ऐतिहासिक लिबर्टी गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीजय देशमुख, कडेगावचे प्रख्यात मूर्तिकार राजेंद्र दीक्षितजी, मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी चन्ने, सूरज देशमुख आदि उपस्थितीत होते.

कडेगावचे लिबर्टी गणेश मंडळ हे कै. सुरेशबाबा देशमुख यांनी स्थापन केलेले ऐतिहासिक गणेश मंडळ असून कडेगावच नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये विधायक कामासाठी आणि आकर्षक कलात्मक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मूर्तिकार राजेंद्र दिक्षितजी हे कडेगावाचे प्रसिद्ध कलाकार, संगीततज्ञ व हौशी मूर्तिकार पापा मिस्त्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. एका प्रथितयश घराण्याचा वारसा असणारे राजेंद्रजी अगदी सुरवातीपासून ‘लिबर्टी’ साठी विशेष मूर्ती बनवत आले आहेत. त्यांच्या निष्ठापूर्वक कलासेवेची सरकार दरबारी अखेर दखल घेण्यात आलेली आहे.

यावर्षीच्या अत्यंत आकर्षक व भव्य गणेशमूर्तीसाठी युवानेते धनंजय देशमुख व ज्येष्ठ नेते चंद्रसेन उर्फ भाऊ देशमुख यांचे प्रोत्साहन लाभल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याची भावना लिबर्टी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्रजी दिक्षित यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.


 

www.kplivenews.com

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व आश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

*विशेष उन्हाळी कार्यशाळा आयोजन सुरु आहे. आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७. शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

‘लिबर्टी’ च्या श्रीगणेशाची राज्यात डंका…!!!

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जनता क्रांती दलाच्या वतीने उद्या कडेगाव येथे मोर्चा: आकाश सातपुते

कडेगाव (सागर वायदंडे): हिंगणगावमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाण व दगडफेकीत मातंग समाजातील काही तरूण मुले जखमी झाल्याच्या निषेधासाठी 

Close