पुलाचे निकृष्ट काम व येरळेतील वाळू उपश्याबद्दल शिवसेनेचा आंदोलनाचा पवित्रा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी): पलूस तालुक्यातील पलूस-आमणापूर रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून यासाठी बेकायदेशीरपणे वाळू उपसली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून त्याबाबतचे निवेदन आज तहसीलदार पलूस व सार्वजनिक बांधकाम उपविभागास देण्यात आल्याची माहिती प्रशांत लेंगरे युवासेना उपजिल्हाधिकारी सांगली यांनी दिली.

आज सादर केलेल्या निवेदनामध्ये पुलाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे व याच कारणासाठी काम थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यापूर्वी तक्रार करण्यात आली होती पण पण त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.  याचबरोबर, शासनाचा अध्यादेश असतानाही बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार शिवसेनेने केली असून महसूल विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.

पुलाचे बांधकाम थांबण्यात आले नाही तर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

याप्रसंगी सेनेचे कार्यकारिणीचे अनेक कार्यकर्ते  व शिवसैनिक उपस्थित होते.


www.kplivenews.com


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व आश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

*विशेष उन्हाळी कार्यशाळा आयोजन सुरु आहे. आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७. शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

पुलाचे निकृष्ट काम व येरळेतील वाळू उपश्याबद्दल शिवसेनेचा आंदोलनाचा पवित्रा

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘लिबर्टी’ च्या श्रीगणेशाची राज्यात डंका…!!!

कडेगाव (सदानंद माळी) : मजबूत युवा संघटनातून आपल्या सामाजिक कार्याची परंपरा अबाधित राखणाऱ्या कडेगावच्या लिबर्टी गणेश मंडळाच्या शिरपेचात आणखी एक

Close