​कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने निषेध  मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे):  हिंगणगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व पिडीत कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी जनता क्रांती दलाच्यावतीने तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. जनता क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंगणगाव येथे मातंग समाजावर झालेल्या हल्ल्यामुळे संपुर्ण कडेगाव तालुक्यातील मातंग समाज भयभीत झाला आहे. तसेच, हिंगणगाव येथील पिडीत मातंग समाजास तात्काळ आर्थीक मदत मिळावी असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणुन आेळखला जातो. परंतु , मातंग समाजावर हल्ला करणे ही घटना गंभीर असुन जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे , असे निवेदनात म्हटले आहे.  हिंगणगाव येथील फिर्यादी व मातंग समाजाला संरक्षण मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी जनता क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते, जनता क्रांती दल जिल्हाध्यक्ष संतोष पिसाळ, युवक जिल्हाध्यक्ष अजित पाटोळे, कडेगाव युवक तालुकाध्यक्ष मंगेश कांबळे, संतोष तुपे, दिपक वाघमारे,अजित वायदंडे, श्रीकांत होलमुखे,शरद वाघमारे  तानाजी तुपे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


​कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने निषेध  मोर्चा

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पुलाचे निकृष्ट काम व येरळेतील वाळू उपश्याबद्दल शिवसेनेचा आंदोलनाचा पवित्रा

पलूस (सदानंद माळी): पलूस तालुक्यातील पलूस-आमणापूर रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून यासाठी बेकायदेशीरपणे वाळू उपसली जात असल्याचा आरोप

Close