टेंभूचं पाणी आमच्या हक्काचं…शेतकऱ्यांचा प्रशासनाला 'दे धक्का'0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना वेळेत मिळत नसल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी कडेगाव परिसरातील शेतकरी गट सक्रीय झाले असून आज याबाबतीत तहसीलदार कार्यालयास निवेदन देण्यात आले.

याच कारणासाठी उद्या कडेगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको व आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांतर्फे देण्यात आली आहे.

गेले काही दिवस अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून संबधित विभागाने याकडे लक्ष देवून आवश्यक त्या सूचना देवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी अखेर शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

आज यासंदर्भात युवानेते धनंजय देशमुख (भैय्यासाहेब) यांनी शेतकऱ्यांच्या गटासोबत तहसीलदार कार्यालयाला भेट देवून निवेदन दिले.

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उद्या (दि. २८ एप्रिल) सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे.

उद्या कडेगाव येथील आठवडी बाजार असल्याने सदर मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग सामील होण्याची शक्यता आहे.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

(जाहिरात)

टेंभूचं पाणी आमच्या हक्काचं…शेतकऱ्यांचा प्रशासनाला 'दे धक्का'

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने निषेध  मोर्चा

कडेगाव (सागर वायदंडे):  हिंगणगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व पिडीत कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी जनता क्रांती दलाच्यावतीने तहसिलदार कचेरीवर

Close