उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार : उदय देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या परीपत्रकानुसार विविध जयंती, पुण्यतिथी आणि शासकीय सण-उत्सव प्रशासकीय कार्यालयात साजरे होत असतात. मात्र या कार्यक्रमांना कडेगावमधल्या काही नगरसेवकांची अनुपस्थिती चिंताजनक आहे. यासंदर्भात कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदय देशमुख  यांनी मिडियाजवळ जाहिर नाराजी व्यक्त केलीय.

आज पार पडलेल्या महाराष्ट्र दिन कार्यक्रमासही तसेच मागील काही प्रशासकीय कार्यक्रमास कडेगावचे उपनगराध्यक्ष साजिद पटेल हेच अनुपस्थित असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सर्व कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधींनी अनुपस्थित राहणे, म्हणजे एक प्रकारे त्या संबंधित उत्सवाचा, महात्म्याचा आणि पर्यायाने आपल्याला निवडून देणाऱ्या जनतेचा अपमानच आहे.

यासंदर्भात लवकरच उपनगराध्यक्ष साजिद पटेल यांच्या राजिनाम्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कोल्हे यांच्याकडे करण्यात येणार असून कारवाई न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही श्री. देशमुख यांनी दिला.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार : उदय देशमुख

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
येरळेतील वाळू चोरी न थांबल्यास आंदोलन: राहुल चन्ने

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव तालुक्यातील येरळेमधील वाळू चोरीसाठीच्या उपश्यामुळे नदीपात्रात विहिरीच्या आकाराचे खड्डे पडले असून याबाबत सबंधित अधिकाऱ्यांकडून फक्त जुजबी

Close