हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद वैश्विक मुल्ये असणारा: विवेक घळसासी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कराड (प्रतिनिधी): भारतातून सुरु होणारा हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद हा संकुचित वृत्ती असणारा नसून वैश्विक मुल्ये असणारा आहे असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते व पत्रकार विवेक घळसासी यांनी केले. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये  काल त्रि-दिवसीय ‘कै. आण्णा भोई स्मृती व्याख्यानमालेच्या अखेरच्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

‘राष्ट्र संवर्धन संस्था, सातारा’ च्या कराड शाखेतर्फे या त्रि-दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत संघ स्वयंसेवकांच्या प्रखर राष्ट्रवादाचा आदर व त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

दिड तासापेक्षा जास्त चाललेल्या ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावरील भाषणामध्ये प्रख्यात पत्रकार विवेक घळसासी यांनी सविस्तरपणे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुख्य प्रवाहातील संकल्पनांचा अभ्यास समोर मांडला.  हिंदू राष्ट्रवाद धार्मिक असल्याचे चित्र रंगवले जाते त्यामुळे बऱ्याचवेळा हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना नकारात्मक पद्धतीने घेतली जाते आणि असा प्रचार करणारे काही गट भारतामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाचे स्वरूप स्पष्ट करताना  विवेक घळसासी यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या जागतिक संकल्पनांपेक्षा हिंदू संस्कृती व तिचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आणि समरस होणारा आहे आणि प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्य असणारा आहे असे सांगितले.

ओघवत्या शैलीत हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रकट करताना घळसासी यांनी भारतातील राष्ट्रवाद हा वैश्विक मूल्यांकडे घेऊन जाणारा असल्याने इतर मापदंड लावून तो तपासणे चुकीचा असल्याचे सांगितले. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीमध्ये घळसासी यांनी हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादावर द्वेष प्रवृत्तीने हल्ला करणाऱ्या व्यक्ती व संस्थां यांचा समाचार घेतला.

राजकीय फायाद्यापोटी समाजांमध्ये द्वेष वाढवला जातो असे प्रतिपादन केले व अश्या प्रवृत्ती ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या प्रार्थनेने झाली. व्याख्यानास कराडकर श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद वैश्विक मुल्ये असणारा: विवेक घळसासी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पुस्तकाच गाव, भिलार त्याच नावं !

महाबळेश्वर (संग्राम इंगळे) :  सह्याद्रिच्या डोंगर रांगात वसलेलं भिलार गावं. गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून याची ओळख आहे. येथे

Close