नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई: जमीर लेंगरेकर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

उल्हासनगर (प्रतिनिधी):  आज उल्हासनगर मनपा व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत आरोग्यास घातक अखाद्य बर्फ लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित नष्ट करण्यात आला. आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले, मुळचे कडेगावचे असणारे व सध्या उल्हासनगर मनपामध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे जमीर लेंगरेकर, यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

अन्न औषध प्रशासनाकडून उपायुक्त मुख्यालयामध्ये  श्री. जमीर लेंगरेकर यांचे कडे आज दुषित बर्फ विक्रीसंदर्भात लेखी तक्रार आली होती. त्यासोबतच अन्न सुरक्षा अधिकारी संतोष वझरकर यांनी भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्यासाठी विनंती केली. दूषित व खाण्यास अयोग्य बर्फ विकून नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई करण्याचा निर्णय लेंगरेकर यांनी घेतला व त्यानुसार प्रभाग अधिकारी यांच्या पथकामार्फत संपूर्ण शहरात कारवाई करण्यात आली.

आजच्या कारवाई दरम्यान विविध ठिकाणी दूषित पाण्यापासून बनवलेला बर्फ उघड्यावर अस्वच्छ ठिकाणी विकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.  सदर कारवाई करताना शहरात ५ ठिकाणी सुमारे २६००० किमतीचा २१२५ किलो दूषित बर्फ नष्ट करण्यात आला.

या संयुक्त कारवाई पथकामध्ये  अन्न सुरक्षा अधिकारी श्री संतोष वझरकर व सहायक आयुक्त अजित गोवारी व गणेश शिंपी उपस्थित होते.

कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत बोलताना उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले की इ-कोलाय (E. Coli) सारख्या जिवाणूमुळे होणारे आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी दुषित बर्फ विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई आवश्यक आहे आणि या कामी मनपा प्रशासन कारवाई बाबत तत्पर असेल. आज पालिकेने केलेल्या कारवाईबद्दल उल्हासनगरमधील नागरीकांमध्ये समाधानचे वातावरण होते.
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई: जमीर लेंगरेकर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या विकासासाठी कटिबद्ध : डॉ. विश्वजित कदम

कडेगाव (सागर वायदंडे): कदम कुटुंबीय विकासाचा उद्देश साध्य करण्यासाठी नेहमीच तयार असतात आणि कडेगावच्या विकासामध्ये यापुढेही भरघोस योगदान राहील अशी

Close