पलूस मध्ये दोन गटात जोरदार हाणामारी: पाणीप्रश्न पेटला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी) : पाणी प्रश्नासंबंधीच्या मिटिंग मधील वादानंतर काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत आज पलूसमध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली तसेच एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्याअशी माहिती समोर आली आहे.

भांडण झाल्यापासून पलूस  शहरातील वातावरण तंग असून घटनास्थळी  चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सांगलीहून जास्ती पोलिसांची कुमक मागवण्यात आली असल्याचे कळते.

दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही हाताना गंभीर दुखापत झाली आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पलूस स्टँडवर बापुसाहेब येसुगडे व खाशाबा दळवी समर्थकात दगडफेक झाली होती असे सांगण्यात येत होते. परंतु, याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी शहरामध्ये वातावरण तंग असल्याचे दिसत आहे.

याबाबत पक्षीय पातळीवर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.


पलूस मध्ये दोन गटात जोरदार हाणामारी: पाणीप्रश्न पेटला

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
दारू धंदे बंद करण्यासाठी नारीशक्ती, ग्रामस्थ धडकणार कडेगाव नगरपंचायतीवर !

कडेगाव (सागर वायदंडे) : शहरातील दारू धंदे बंद व्हावेत, यासाठी आता कडेगावतील नारीशक्ती आणि ग्रामस्थ नगरपंचायतीवर धडकणार आहेत. गुरूवार दि.

Close