आमदार चषक सेलिब्रेटी क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : देवराष्ट्रे  इथ झालेल्या आमदार चषक क्रिकेटमध्ये पत्रकार विरुद्ध पोलीस संघात चुरशीचा सामना रंगला. या सामन्यात पत्रकार संघाने पोलीस संघावर १ बॉल राखून विजय मिळवला.

पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. निर्धारीत ५ षटकात पोलीस संघाने ४६ धावा काढल्या. पोलीस संघातील खेळाडूंनी चौकार आणि षटकार ठोकत पत्रकार संघातील गोलंदाजांचा समाचार घेतला.

यानंतर पत्रकार संघातील खेळाडूंनीही तडाखेबाज खेळी केली आणि १ बॉल राखून विजय मिळवला. पत्रकार संघाचे नेतृत्व प्रताप महाडीक यांनी केले तर पोलीस संघाचे नेतृत्व चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे स.पो.नी. मनोज सोलवनकर यांनी केले. दोन्ही संघाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .




मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

 

आमदार चषक सेलिब्रेटी क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
साहित्यिक सुनील चव्हाण यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

कडेगाव (सदानंद माळी): साहित्यिक सुनील चव्हाण ('सर') यांना कोल्हापूर येथे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळचे नेवरी या गावचे

Close