पर्यावरण गेलं राजकारणाच्या चुलीत…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

संपादकीय

…तसं पाहिलं तर वाळूला काही वर्षांपूर्वी वाळूइतकीच किंमत होती. एखादा अभ्यासू वक्ता आपल्या भाषणात सांगायचा, “ …वाळूचे कण रगडीता तेलही गळे.” अर्थात प्रत्यक्ष वाळूचा याच्याशी काही संबंध नव्हता, पण प्रयत्न केला तर काहीही अशक्य नसतं, असं यातून वक्त्यांना सांगायचं असतं. कदाचित याचं शब्दांचा वेगळा अर्थ घेत आज वाळूचे कण ‘रगडून’ त्यातून पैसा निर्माण करण्याचा ‘बोध’ काहींनी घेतल्याचं दिसतं. वाढतं नियोजनशुन्य शहरीकरण आणि त्यामुळं सतत वाढणाऱ्या बांधकामांना हवा असणारा प्रचंड वाळू पुरवठा, यातूनच हा एक नवा व्यवसाय निर्माण झाला. शून्य भांडवल आणि भरपूर नफा असं या व्यवसायाचं स्वरूप. पर्यावरण रक्षण आणि सरकारचा मालकी हक्क यामुळं यावर कायद्यानं प्रशासनाचा अंकुश आलाच. सरकारी नियमांना असणा-या पळवाटांचा फायदा घेत आणि प्रसंगी हे नियम पायदळी तुडवत अनेकांनी आपले ‘नशीब’ आणि पर्यायानं परस्थिती बदलली. कमी कष्टात जास्त पैसे मिळवण्याचं स्वप्न चोवीस तास उराशी बाळगणारे नव्या पिढीचे काही प्रतिनिधी यात सामील झाले आणि सुरु झाला एक नवा झटपट ‘परीवर्तना’चा मार्ग…!

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यात सध्या वाळूवरून राजकारण तापलंय. काँग्रेसचे युवा नेते डॉ. विश्वजित कदम यांनी नुकत्याच झालेल्या कडेगाव दौ-यात याबाबत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यावर आरोप केले. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी निवेदन देने व त्याच्या बातम्या आवर्जून छापून आणणे यावरही काम केले आहे. वाळूच्या वस्तुस्थितीचा खुलासा यथावकाश होईलच, परंतु या अनुषंगानं उपस्थित झालेल्या अन्य महत्वाच्या प्रश्नांवर कोण चर्चा करणार, हे ही तितकंच महत्वाचं आहे.

राहायला सुंदर बैठी घर असताना प्रॉपर्टीच्या हव्यासापायी होणा-या भरमसाठ बांधकामांसाठी बेसुमार वाळू उपसा झाला. त्यामुळं नदीचं पात्र बदललं. पर्यावरणाची कधीही न भरून येणारी हानी झाली. त्याचे परिणाम मनुष्य आणि प्राणी-पक्ष्यांना आजही भोगावे लागताहेत. याची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही? पर्यावरणीय दृष्ट्या गंभीर प्रश्नावर ‘पर्यावरणाचे’ मुद्दे मुख्यत्वे चर्चेत येणे आवश्यक असते. पण, सध्या फक्त राजकीय कलगीतुरा पाहण्यापलीकडे काहीच पर्याय दिसत नाही. पूर्ण देशात प्रागतिक आणि चळवळ आधारित राजकारणाची परंपरा असणारा कडेगाव-पलूस परिसर हा असा एकांगी आणि पर्यावरणापासून विभाजित होऊन दूर का जावा, याची कारणे तपासणेही तितकेच आवश्यक आहे.

अनेक साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्र, गावांचे शहरीकरणामुळे वाढलेलं कुरूपपण, कंपन्यांच्या प्लास्टिकच्या वेष्टनांमुळे सर्वत्र केला जाणारा कचरा अश्या अनेक मुद्यांविषयी आपण भुलीचे इंजेक्शन घेतल्यासारखे गप्प राहतो आणि वाळू उपश्यासारखे प्रश्न पर्यावरण हानीच्या चौकटीत न पाहता फक्त राजकीय चौकटीत पाहतो. हे मुल्यात्मक राजकारणाला साजेसं नाही. किंबहुना पर्यावरणासाठी याबाबतीत लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे. इथे हाही मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे की कडेगाव-पलूस परीसरात जसे ठराविक घराणी सोडता राजकारण विकसित झाले नाही तसेच समाजकारण करणाऱ्या सामाजिक संस्थांची जातकुळीसुद्धा तयार झालेली नाही. हे जिवंत समाज असण्याच लक्षण नाही, अस काही विचार करणाऱ्या लोकांना वाटले तर त्यात गैर नाही. सकस समाजाची निर्मिती ही प्रशासन-लोकनियुक्त प्रतिनिधी-खाजगी क्षेत्रे-सामाजिक संस्था गट यांच्यातील विशिष्ट युतीमध्ये नव्हे तर संघर्षामध्ये तयार होते, हे कळणारा सुशिक्षित समाज आणि सुज्ञ मतदार कडेगाव-पलूस परिसरात निश्चित राहतो. पण त्याची नोंद घेणारे संवेदनाशील राजकारणी नसल्याने एकूणच विकासाची प्रक्रिया एकांगी झालीय. वाळूचा प्रश्न हे फक्त पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाच्या पर्वताचे टोक आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा ‘शुगर बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. समृद्ध आणि संपन्न…अशी आमची देशात ओळख. परंतु आज आमची मुख्य ओळख बनलेल्या साखर उद्योगानं किती रोजगार निर्मिती केली? किती युवक आज या उद्योगात आहेत? वाळू तस्करीसारखे उद्योग आज या युवकांना जवळचे वाटतात, यावरूनच आज एक भीषण वास्तव समोर उभं राहतंय. गावात मिळणारी नोकरी ही कमी पगाराची आणि राजकारण्यांच्या मागे लागल्याशिवाय न मिळणारी, हे आता इथल्या तरुणाईच्या मनावर बिंबलं गेलय. त्यामुळं आता समाजाला पुढं घेवून जायचं असेल तर राजकारणापलिकडं जावून रोजगारनिर्मिती, नवे प्रकल्प यावर सुसंवाद आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर सक्षम आणि चांगला पगार देणारी नोकरी हे शक्य आहे पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. स्वस्तात उपलब्ध असणारे मनुष्यबळ वापरून फक्त स्वतःची प्रगती करणारी उद्योजकता कडेगाव-पलूस भागात तयार झाली तर ती इथल्या विकासाच्या राजकारणाची हार असेल हे कुणीही सांगू शकेल. इथला सुज्ञ मतदार हे सार पाहतोय हे सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

पर्यावरण गेलं राजकारणाच्या चुलीत…!!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वाळु तस्करांवर कडक कारवाई करा-विश्वजीत कदम

कडेगांव (सागर वायदंडे) : तालुक्यामध्ये वाळु तस्करांचा उत्मात चालला आहे. वाळु ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम भाजपचे स्थानिक नेतृत्व करत आहे.

Close