डी.एड. व बी.एड. धारकांसाठी ‘युरोप’ संस्था देणार संपूर्ण भारतात रोजगार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नांदेड (प्रतिनिधी): ‘युरोप’च्या म्हणजेच ‘युवा रोजगार परिषदे’च्या वतीने डी.एड., बी.एड., सिटीसी., क्रीडा, संगीत, कला या पदविका व पदवी धारकांच्या नावनोंदणी अभियान राबविण्यात आले होते, त्या अभियानात नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना युरोप च्या वतीने संपूर्ण भारतात रोजगार देण्याचा निर्णय युरोपच्या वतीने घेण्यात आले असल्याचे युरोप चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत गोविंदराव कलमूर्गे यांनी सांगितले आहेत.

भारतातील संपूर्ण राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गाव पातळीवर प्रतिनिधी नेमून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे कलमूर्गे यांनी सांगितले आहे.  यांच्याबरोबरच ग्रामीण व शहरी भागात जे युवक – युवती अर्धवट शिक्षण सोडले आहेत किंवा शिक्षणापासून व समाजापासून वंचित आहेत त्यांना स्वावलंबी बनवून रोजगाराभिमुख कोर्सेस शिकवून रोजगार निर्माण करून देणार असल्याचेही लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले आहेत.

युवा रोजगार परिषदेच्या माध्यमातून गेल्या दोन – तीन वर्षांपासून डी.एड., बी.एड., सिटीसी., क्रीडा, संगीत, कला या पदवी व पदविका धारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनेक वेळा चर्चा सत्रे राबवले होते , चर्चा सत्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी न्याय मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने, उपोषणे तसेच मोर्चेही काढण्यात आले असल्याचे युरोप चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत गोविंदराव कलमूर्गे यांनी सांगितले आहेत.

लवकरच नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलाखती घेण्यात येणार आहेत, निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९१७५९१८०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कलमूर्गे यांनी केले आहेत. मुलाखतीचे ठिकाण व वेळ लवकरच प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपणास कळविण्यात येईल.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

डी.एड. व बी.एड. धारकांसाठी ‘युरोप’ संस्था देणार संपूर्ण भारतात रोजगार

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​दलित वस्ती कामाचे पुन्हा भूमिपूजन, हा विरोधकांचा खोडसाळपणा : नगराध्यक्षा जाधव 

कडेगाव (प्रतिनिधी) : दलित वस्ती सुधार योजनेतील कामाचे भूमिपूजन यापूर्वी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते झाले असताना परत भूमिपूजन करणे,

Close