चिखलीत बुद्ध जयंती उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

चिखली (सागर वायदंडे): भिमसेन ग्रुप तर्फे चिखलीत रथ, घोडे, लेजीम व झांज पथकाच्या जल्लोषात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी भिमसेन मंडळाचे अध्यक्ष व मराठी चित्रपट सहनिर्माते  शंकर आंबवडे  यांनी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन केले. युवकांना उद्देशून भाषण करताना शंकर आंबवडे म्हणाले की तरुणांनी जीवनात खुप मोठे यश मिळवायचे असेल तर भगवान बुद्धाचे विचार आत्मसात केले पाहीजे.

मुख्य बुद्धवंदना कार्यक्रम व भाषण यानंतर चिखली गावातून मिरवणूक काढण्यात आली. या भव्य-दिव्य मिरवणूकीमध्ये शिवाजी महाराज,गोतम बुध्द, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व मावळ्यांची वेशभूषा करीत शांततेचा संदेश देणाऱ्या घोषणा तरुणांनी दिल्या. पाणी वाचवा-जीवन वाचवा, मुलगी वाचवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश असणारे फलक घेऊन मिरवणूक काढण्यात आली होती.

बुद्ध जयंती कार्यक्रमासाठी अंकुश मंडले, राजू गायकवाड, आत्माराम आंबवडे, संतोष आंबवडे, मधूकर आंबवडे, कुणाल आंबवडे, बापू आंबवडे, नामदेव आंबवडे व मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मीय उपस्थित होते.

सर्वाचे आभार उपाध्यक्ष मोल आंबवडे यांनी मानले.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

चिखलीत बुद्ध जयंती उत्साहात साजरी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सर्व अवैध धंदे कॉंग्रेस ठेकेदारांचेच: पृथ्वीराज देशमुख

कडेगांव (प्रतिनिधी):  तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे  खुप मोठ्या प्रमाणत वाढलेले आहेत, आणि  ते थांबवण्यासाठी आमच्या पद्धतीने आम्ही काम करत

Close