पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

संपादकीय

स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीचा विचार करता, कोणत्या पक्षाने किती विकास केला, हे अगदी तंतोतंत छातीठोकपणे सांगणे आजही अशक्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विकास ही सतत, अथकपणे चालणारी प्रकिया आहे. सत्ता असो किंवा नसो, राजकीय पक्षांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विकासांचा एककलमी कार्यक्रम सतत चालु ठेवावा लागतो. त्यावरून कुठेतरी श्रेयवादाच राजकारण सुरु झाले की मग या प्रक्रियेवरूनच जनतेचा विश्वास उडायला लागतो. राजकारणात आपले स्थान बळकट करू पाहणाऱ्या नव्या पिढीला तर याबाबत खुप दक्ष राहावे लागते.

कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच टर्ममध्ये विकासकामाचा श्रेयवाद रंगलाय. दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत एका कामाच्या उद्घाटनावरुन काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांचा कलगी-तूरा चांगलाच रंगलाय. खरे तर विकासाची प्रक्रिया ही पारदर्शक असते. त्या कामाला मंजूरी देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेकडून अर्ज कोणी केला, शिफारस कोणाची, तांत्रिक डिटेल्स काय आहेत, याची माहिती मिळू शकते. त्यामुळे माध्यमांमधल्या आरोप-प्रत्यारोपातुन नक्की कोण कोणाच समाधान करुन घेतं आणि कोण कोणांच मनोरंजन करत, हाच प्रश्न उपस्थित होतो.

सुदैवानं कडेगावला चरण कोल्हे यांच्यासारखे अभ्यासु मुख्याधिकारी लाभले आहेत. कडेगावचा सर्वांगीण विकास कसा करायचा, याचा अल्पावधित अभ्यास करुन त्यांनी आराखडा तयार केलाय. खरे तर अशा अधिकाऱ्यांच्या मदतीनेच कडेगावचा सर्वांगीण विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या टर्मला आता कुठे सुरुवात होत आहे. ही सुरुवात राजकीय संघर्षाने न होता विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून व्हावी, हीच अपेक्षा…कारण ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !!!
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
महिलांना प्रशिक्षणातून रोजगार मिळवून देणार: आ. मोहनराव कदम

कडेगाव (सागर वायदंडे): भारती विद्यापीठ ग्रामीण विकास प्रतिष्ठान केंद्र व नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कडेगाव येथे सुरु

Close