अच्छे दिन, अच्छे दिन…बेरोजगार झाला आणखी ‘दीन’!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : ‘अच्छे दिन’ वाल्या मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या वाटचालीत कोणाकोणाला अच्छे दिन दाखवले माहीत नाही, परंतु रोजगार निर्मितीसाठी हे सरकार साफ अपयशी ठरल्याच दिसतं. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षात रोजगार निर्मितीच्या टक्केवारीत ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजे जिथ अगोदर १०० लोकांना नोकरी मिळत होती, तिथे फक्त ५० ते ६० लोकांनाच नोकरी मिळते आहे.  प्रमुख आठ संघटीत क्षेत्रांचा विचार केला तर २०१० मध्ये आघाडी सरकारच्या काळात जिथ १० लाख लोकांना रोजगार मिळत होता, तिथ आता केवळ दीड किंवा दोन लाख लोकच नोकरी मिळवू शकले.

घरगुती उत्पादन क्षेत्रात मोठी घसरण आहे. आघाडी सरकारच्या काळात हा दर ८.५  होता. एनडीएच्या काळात तो ७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे परंतु तो ५ किंवा ५.५  इतका असल्याचा अभ्यासुंचा अंदाज आहे. औद्योगिक उत्पादनातही एका टक्क्याची घसरण दिसत आहे.  नोटबंदीचाही परिणाम रोजगारनिर्मितीवर  झाल्याचे दिसते. २०१६-१७ मधील कर्ज वाटपाचे आकडे पाहिले तर गेल्या साठ वर्षातील सर्वात कमी कर्जवाटप करण्यात आलेय. अशी घसरण यापूर्वी १९५८ मध्ये पाहायला मिळाली होती.

सर्वात गंभीर स्थिती ‘आयटी’ सेक्टरची आहे. सध्या ४० लाख लोक काम करताहेत. मात्र पुढील चार ते पाच वर्षात यातील निम्म्याहुन अधिक लोकांना नोकरी नसेल. देशासमोर हे मोठ आव्हान असेल.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

अच्छे दिन, अच्छे दिन…बेरोजगार झाला आणखी ‘दीन’!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
चिखलीत बुद्ध जयंती उत्साहात साजरी

चिखली (सागर वायदंडे): भिमसेन ग्रुप तर्फे चिखलीत रथ, घोडे, लेजीम व झांज पथकाच्या जल्लोषात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी

Close