सर्व अवैध धंदे कॉंग्रेस ठेकेदारांचेच: पृथ्वीराज देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगांव (प्रतिनिधी):  तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे  खुप मोठ्या प्रमाणत वाढलेले आहेत, आणि  ते थांबवण्यासाठी आमच्या पद्धतीने आम्ही काम करत असून बहुतांश अवैध धंदे कॉंग्रेसच्या ठेकेदारांचेच आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार परीषदेत दिली.

पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले की चार वर्षापुर्वी सांगली जिल्हात दारूबंदीचे पहीले पाऊल भाजपनेच उचलंल आणि पहिल्यांदा कडेपुरमध्ये बाटली आडवी झाली. तसेच, कडेगांवमध्येही दारूबंदीच पाउल भाजपनेच उचलले आहे. कडेगांव नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते उदय देशमुख यांच्या पुढाकाराने व गावातील महिलांना सोबत घेऊन आम्ही कलेक्टरांना यासंदर्भात निवेदन दिले. कडेगांव मधील सर्व दारू दुकाने कॉंग्रेसच्याच ठेकेदारांची आहेत, त्याच्या याद्या तपासा मग आमच्यावर आरोप करा असे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केले. आमच्यावर आरोप करणाऱ्याला ‘जशास तसे उत्तर देउ’ असे देशमुख यांनी प्रकट सांगितले.  शेवटी सत्ता भाजपचीच आहे त्यामुळे संपूर्ण कडेगांव तालूक्याचा विकास भाजपच करणार असल्याचे त्यानी सुतोवाच केले.

पुर्वीच्या रस्त्यांपेक्षा आताची रस्त्याची कामे एकदम चांगल्या प्रकारची आहेत. मागच्या चार वर्षात जे रस्ते झाले ते आता राहिलेच नाहीत कारण आधीच्या लोकांनी निकृष्ट दर्जाची कामे केली होती. आताची कामे  राज्य सरकारने पारदर्शकपणा दाखवल्यामुळे  चांगल्या पद्धतीची आहेत आणि यासाठी निधी देण्याचाही प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.

कडेगाव बस स्थानकाचा प्रश्न समोर आणताना देशमुख म्हणाले की तीन वर्षे झाली तरीही अजून कडेगांव एस टी स्थानकाचे काम चालूच आहे, अजूनही ते पुर्ण झालेले नाही. यामुळे प्रवाश्यांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात,  एस. टी. च्या अधिकाऱ्यांना भेटून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाबंधी सांगितले आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका कारण त्यांनीच विकास कामाची वाट लावली आहे असेही ते म्हणाले.

भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचा समाचार जिल्हाध्यक्ष या नात्याने माजी आमदार पृथ्वीराज बाबा यांनी या पत्रकार परीषदेत घेतला व चौफेर चर्चा केली.

या पत्रकार परीषदेदरम्यान पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, युवक नेते धनंजय देशमुख (भैय्यासाहेब), कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते उदय देशमुख, लक्ष्मण मोरे, कृष्णत मोकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

सर्व अवैध धंदे कॉंग्रेस ठेकेदारांचेच: पृथ्वीराज देशमुख

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

संपादकीय स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीचा विचार करता, कोणत्या पक्षाने किती विकास केला, हे अगदी तंतोतंत छातीठोकपणे सांगणे आजही अशक्य आहे.

Close