‘भाऊ’ असावा तर असा…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

वाढदिवस विशेष लेख

राजकारण म्हणजे असतं तरी काय, कोणी सांगेल का व्याख्या?

मुंडया मुरगाळून, त्यांना वेठीस धरून, खोटी आश्वासन देवून सत्ता बळकावणं म्हणजे राजकारण की आपल्या भूमिकेला, परंपरेला, विचाराला तिलांजली देवून केवळ सत्तेतुन पैसा अन पैशातून सत्ता हा मंत्र जपणं आणि पाच पिढयांची तजवीज करून ठेवणं म्हणजे राजकारण?

ज्यांच्या राजकारणाला मुळंही नसतात,  बुंदाही नसतो आणि फांद्याही नसतात, त्यांच्यासाठी या व्याख्या ठिक आहेत. परंतु राजकारणाची खरी व्याख्या आहे ती कोणत्याही ‘कारणा’शिवाय आपल्या व्यक्तीच्या ‘हृदया’वर आणि ती व्यक्ती तुमच्या ‘हृदया’वर राज्य करते ते खरं राजकारण…आणि या व्याख्येत अगदी चपखल बसतात ते आमचे युवानेते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख.

ज्येष्ठ नेते दिवंगत संपतरावजी देशमुख यांच्या राजकारणाचा वसा, वारसा, विचार आणि तळमळ ज्यांच्याच प्रतिबिंबित आहे, असं युवा नेतृत्व. सर्वसामान्यांना हदयापासून आपलं वाटावं असं, एकमेव नेतृत्व. सत्ता आणि संपत्ती याच्याही पुढं जावून ‘सर्वसामान्य जनतेचं पाठबळ हीच माझी खरी संपत्ती’ हा विचार अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे नेते स्व. संपतरावजी देशमुख यांचा हा विचार जपणारं नेतृत्व.

युवा नेते संग्रामसिंह देशमुख अगदी लहानपणापासून राजकारण आणि समाजकारणाच्या सानिध्यात आहेत. लोकांचे प्रश्न, ते सोडवण्याची आण्णांची एक वेगळी खासियत, आण्णांचं सर्वसामान्य जनतेत एकरूप होणं, आण्णांची पाणीप्रश्न सोडवण्याची तळमळ, त्यासाठी त्यांनी सोसलेल चटके…या सर्व वाटचालीचे ते साक्षीदार. केवळ निवडणूका जिंकणं, कटाच्या इस्त्रीची सफेद कपडे घालुन मिरवणं, यामुळं कोणी नेता होत नसतो. सत्तेची खुर्ची मिळो न मिळो पण सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आपण जे स्थान मिळवतो तिथं कधीही सत्तांतर होत नसतं. हीच एक खुपच आश्वासक बाजु संग्रामसिंह यांनी आण्णांच्या विचारातुन घेतली आणि म्हणुनच ते आज सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या
राजसिंहासनावर कायमचे विराजमान आहेत. युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांना आबालवृध्द प्रेमानं भाऊ म्हणतात. या नावात जेवढा जिव्हाळा आहे, तितकाच जिव्हाळा त्यांच्या मनातही आहे. भाऊंनी अतिशय संघर्षमय काळ पाहिलाय. सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर कडवा संघर्ष केलाय. प्रस्थापितांना टक्कर देताना खुप काही गमावलंयही. परंतु या घराण्याशी सर्वसामान्य जनतेची, त्यांच्या सुखदुःखाशी असलेली नाळ त्यांनी आजही मोठया अभिमानानं जपलीय. हीच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची ओळख आहे.

आज अनेक संस्थांच्या माध्यमातुन त्यांनी इथल्या बेरोजगांरांच्या हाताला काम दिलंय. अनेकांच्या घरात प्रगतीचा दिपक प्रज्वलित केलाय.
पिढयानपिढयांचं दारीद्रय त्यांनी दुर केलंय. समाजाचं भवितव्य ज्या युवा पिढीच्या हातात आहे,  त्यांना सख्ख्या भावाप्रमाणं आधार दिलांयं.
त्यांच्या जीवनात प्रकाश पेरलाय. या सर्वांच्या पाठबळानं आणि आण्णांच्या आशिर्वादान त्यांना या परिसराचं सोनं करण्यासाठी सर्वोच्च पद मिळो, हीच त्यांच्या जन्मदिनी विधात्याजवळ प्रार्थना.

कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिममुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

‘भाऊ’ असावा तर असा…!!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अखेर सोशल मिडिया कार्यशाळेच आयोजन कडेगावमध्ये

कडेगाव (सागर वायदंडे) : सोशल मिडीयाचा कायदेशीर, अचूक आणि प्रभावी वापर कसा करायचा, याचं आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी कडेगाव इथं प्रथमच

Close