लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशीही हेलिकॉप्टरमध्ये होते. सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय. “मी सध्या निलंग्यातच आहे, मला काही झालेलं नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. शुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे, सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना दिली.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिलाईमशीनचे आमिष दाखवून युवा परिवर्तनकडून दिशाभूल

नांदेड (प्रतिनिधी): खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन, मुंबई या संस्थेअंतर्गत युवा परिवर्तन या नावाने अकॅडमीची सुरुवात करून स्किल इंडिया या योजने

Close