शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यकांत घुगरे यांची निवड0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोल्हापूर (प्रतिनिधी): बसवदृष्टी केंद्र कोल्हापूर आणि वचन अकादमी पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी बार्शीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुर्यकांत घुगरे यांची निवड करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे येत्या २८ व २९ मे रोजी हे शिबीर होत असून ‘लिंगायत एक स्वतंत्र धर्म’ आणि ‘अल्पसंख्यांक दर्जा’ हा या शिबिराचा मुख्य विषय आहे.
या कार्यक्रमासाठी बीदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थचे मठाधिपती डॉ. बसवलिंग पट्टदेव, बंगळूरु येथील राष्ट्रीय बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, बाळासाहेब पाटील यांचेसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यवतमाळ येथील ज्येष्ठ शरण साहित्यिक अशोक मेनकुदळे यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येत आहे.
या शिबीरात लिंगायत धर्मावरील अभ्यासकांचे विविध विषयांनुसार सहा सत्रांत मार्गदर्शन होणार आहे. यात २८ मे रोजी डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, अरविंद जत्ती,  प्रा.भालचंद्र जयशेट्टी (कलबुर्गी), प्रा.सिध्दण्णा लंगोटी (रामदुर्ग), आर.एम. करडीगुद्दी (बेळगाव), डॉ.  रेखा कोट्टर (धारवाड), डॉ.नलिनी वाघमारे (पुणे), डॉ.अशोक मेनकुदळे (यवतमाळ), अभिषेक देशमाने (पुणे), नरेश कुर्‍हेकर (अमरावती) आदींसह इतर मान्यवर लिंगायत धर्माविषयी मार्गदर्शन करणार आहेत.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

One thought on “शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यकांत घुगरे यांची निवड

Comments are closed.

शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यकांत घुगरे यांची निवड

by admin वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत

Close