शिलाईमशीनचे आमिष दाखवून युवा परिवर्तनकडून दिशाभूल0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नांदेड (प्रतिनिधी): खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन, मुंबई या संस्थेअंतर्गत युवा परिवर्तन या नावाने अकॅडमीची सुरुवात करून स्किल इंडिया या योजने अंतर्गत काही ग्रामीण भागातील युवक व युवतींना शिलाई मशीन कोर्स शिकल्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीतर्फे शिलाई मशीन मोफत मिळेल, अशा प्रकारची भूल देत ग्रामीण भागातील युवक-युवतींची दिशाभूल करीत असल्याचे भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

स्किल इंडिया अंतर्गत असल्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचेही सांगितले, पण त्यांना युवा परिवर्तन या संस्थेचे प्रमाणपत्र देत आहेत, त्याचा उपयोग कुठेही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर युवकांचे व युवतीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार देण्यात येणार असल्याचे खोटे आश्वासन देत आहेत. तसेच स्किल इंडिया च्या योजनेत मोफत कोर्स असताना सुद्धा ६०० रुपये फी आकारणी करीत आहेत. कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगूनही अनेक ठिकाणी जवळपास दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रमाणपत्र आलेले नसल्याचे भ्र. नि. स. च्या वतीने सांगण्यात आले.

या संस्थेचे मुख्य जिल्हा कार्यालय जंगमवाडी नांदेड येथे आहे, तरी शहरातील व ग्रामीण भागातील युवक युवतींनी युवा परिवर्तन बद्दल सतर्क राहण्याचे आवाहन भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती भ्र. नि. स. चे महाराष्ट्र प्रदेश सचिव लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी दिली आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शिलाईमशीनचे आमिष दाखवून युवा परिवर्तनकडून दिशाभूल

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
विजय माळींच्या कादंबरीला ‘देवदत्त पाटील पुरस्कार’

कोल्हापुर (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यावतीने उत्कृष्ट कादंबरीसाठी दिला जाणारा  'देवदत्त पाटील पुरस्कार' साहित्यिक विजय शं. माळी

Close