विजय माळींच्या कादंबरीला ‘देवदत्त पाटील पुरस्कार’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोल्हापुर (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यावतीने उत्कृष्ट कादंबरीसाठी दिला जाणारा  ‘देवदत्त पाटील पुरस्कार’ साहित्यिक विजय शं. माळी यांच्या ‘आर्त माझ्या बहु पोटी ‘ या ग्रंथाली, मुंबई प्रकाशित कादंबरीला जाहीर झाला आहे.

याआधीही श्री. माळींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या नावावर २ कथासंग्रह ( २ आवृत्त्या ), १ कवितासंग्रह, १ ललितगद्यसंग्रह, १ इतिहासपर, १ कादंबरी अशी सहा पुस्तके असून त्यांच्या दोन पुस्तकांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रकाशन अनुदानासाठी निवड झाली आहे.

कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, इतिहासपर, चिंतनात्मक, वैचारिक, स्फुट इ. वाङ्मयप्रकारांमध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. आकाशवाणी पुणे, सांगली केंद्रांवरून त्यांच्या कविता, कथा, ललित लेख, चिंतने इ. प्रसारित झाली आहेत.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

विजय माळींच्या कादंबरीला ‘देवदत्त पाटील पुरस्कार’

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कडेगाव : युवकांचे आशास्थान, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष

Close