कुनाचं बी काम नाय ह्ये …!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव-पलूस लाइव न्यूज ही वेबसाईट आता नव्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे. आपल्या भागांत आणखीही काहीतरी नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही विडीओ न्यूज ब्रोडकास्ट आणि इतर डिजिटल मोडस वापरून बातम्या व माहितीचे वितरण सुरु करत आहोत. एकूणच कडेगाव-पलूस भागात आम्ही सुरु केलेली माहितीची क्रांती आता नव्या वेगात पुढे जात आहे.

आपण ग्राहक म्हणून याचा भाग आहात. पण, आता आपल्यांला आणखी एक संधी म्हणा चान्स म्हणा मिळत आहे.

आमच्या सगळ्या नव्या सिस्टीम साठी आम्हाला तरुण सळसळत्या रक्ताचे, धाडसी, प्रशिक्षणार्थी पत्रकार व मार्केटिंग प्रतिनिधी हवे आहेत.

कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व मुख्य गावात प्रशिक्षणार्थी पत्रकार व अधिकृत मार्केटिंग प्रतिनिधी व जाहिरात संकलन केंद्रे देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक आसाल, आपल्यामध्ये काम करायची धमक असेल,  व्यावसायिक कौशल्याबरोबरच सामाजिक योगदान द्यायची तयारी असेल, आणि ‘पाट्या टाकणारे’ या गटात आपण मोडत नसाल तर आम्ही आपले ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ च्या टिम मध्ये स्वागत करतो.

इच्छुक लोकांनी आपले resume व जाहिरात संकलन केंद्रासाठीचे प्रस्ताव desk@kplivenews.com वर इमेल करावेत. 

पर्यावरणवादी धोरण म्हणून आम्ही इमेल द्वारे जास्तीतजास्त संवाद साधतो, आपण आमच्या धोरणाचा आदर कराल अशी अपेक्षा.

आपण किमान १० वी पास असावेत अशी अपेक्षा आहे, विशेष परिस्थितीमध्ये यात कन्सेशन देण्यात येईल.

पटकन माहिती पाठवा किंवा फोन मारा अस आम्ही अजिबात म्हणणार नाय.

कारण स्पष्ट हाय…..कुनाचं बी काम नाय ह्ये …!!!

(कडेगाव-पलूस लाइव न्यूज सर्व जाती-धर्माच्या, सर्व आर्थिक वर्गातून येणाऱ्या, ग्रामीण-शहरी, जास्त किंवा कमी शिकलेल्या सर्व स्त्रीया व पुरुष उमेदवारांचे स्वागत करते. )

 

कुनाचं बी काम नाय ह्ये …!!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डिजिटल पुणे २०२० मध्ये ‘कृषी विकास’ संस्थेला पहिली NGO पार्टनर होण्याचा मान

पुणे (प्रतिनिधी): 'पुणे सिटी कनेक्ट' व 'नास्कॉम फौंडेशन' द्वारा  आयोजित  "डिजिटल पुणे २०२०" चा  शुभारंभ भव्य समारंभात काल पुण्यामध्ये झाला.

Close