डिजिटल पुणे २०२० मध्ये ‘कृषी विकास’ संस्थेला पहिली NGO पार्टनर होण्याचा मान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे (प्रतिनिधी): ‘पुणे सिटी कनेक्ट’ व ‘नास्कॉम फौंडेशन’ द्वारा  आयोजित  “डिजिटल पुणे २०२०” चा  शुभारंभ भव्य समारंभात काल पुण्यामध्ये झाला. या अभिनव डिजिटल टेक्नोलोजी संबंधी महत्वपूर्ण अश्या आयोजनामध्ये अनेक तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या संस्थाबरोबरच ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ या विदर्भातील संस्थेने पहिला  “NGO इम्प्लेमेंटिंग पार्टनर”  होण्याचा मान मिळवला आहे.

मा. ना. गिरीश बापट यांचे हस्ते संस्थेच्या विशेष योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. संस्थेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार नाफडे यांनी सत्कार स्वीकारला.

या प्रसंगी पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ताताई टिळक, पुण्याचे आयुक्त श्री. कुणाल कुमार, नासकॉम चे अध्यक्ष श्री. नटराजन व इतर  मान्यवरांचे हस्ते झेंसार, नासकॉम व कृषी विकास संस्था यांचे माध्यमातून सुरू झालेल्या डिजिटल बसेसचा शुभारंभ करण्यात आला.

सुरवातीपासून ग्रामीण विकासाची धुरा सांभाळणारी ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ ही ज्येष्ठ समाजसेवक व विकासोन्मुख राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणरे दिलीपराव नाफडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. ग्रामीण भागातून आपले समाजसेवेचे कार्य आता संस्थेने महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये तसेच भारतभर पसरवण्याचा निर्धार केला आहे.

अलीकडेच ‘ग्रामीण विकास’ने एक संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते त्याचा विस्तार म्हणून आता तीन नव्या बसेस सुरु करण्यात आलेल्या आहेत. ‘पुणे सिटी कनेक्ट’ या संस्थेद्वारा इतर संस्थांच्या सहकार्यातून १०० नवी प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार असून त्यातही ‘कृषी विकास’ चा सहभाग असेल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल २ लाख नागरीकांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींचे डिजिटल भारताचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिकेच्या संगणकीकृत सेवांसोबतच त्या वापरण्याचे प्रशिक्षण नागरीकांना मिळणे आवश्यक आहे आणि त्या कामी हा उपक्रम क्रांतिकारी बदल घडवून आणणार असेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

 

डिजिटल पुणे २०२० मध्ये ‘कृषी विकास’ संस्थेला पहिली NGO पार्टनर होण्याचा मान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यकांत घुगरे यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): बसवदृष्टी केंद्र कोल्हापूर आणि वचन अकादमी पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी बार्शीतील

Close