उदगीर येथे अनुभव मंटपाचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

उदगीर (अभिषेक देशमाने): लातूरजवळील उदगीर येथे येत्या ५ जून ला मासिक अनुभव मंटपाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक शरण राजकुमार बिराजदार बामणीकर व शरण शिवराजप्पा भद्रप्पा तोंडारे, सोमनाथपूर यांनी दिली.

‘हिरेमठ संस्थान, भालकी’ तर्फे संचालित ‘महाराष्ट्र बसव परिषद’ यांच्यावतीने सुरु असलेल्या व्याख्यानमालेचे ५१ वे पुष्प या अनुभव  मंटपामध्ये गुंफले जाणार आहे.

या कार्यक्रमास प. पु. डॉ. श्री. बसवलिंग पट्टदेवरू यांचे प्रमुख सानिध्य लाभणार असून शरण मा. श्री. चंद्रकांत वैजापुरे हे अध्यक्षस्थानी असतील. शरण प्राचार्य डॉ. राजकुमार लाखादिवे हे प्रमुख वक्ते म्हणून या अनुभव मंटपामध्ये बोलतील. त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल ‘महात्मा बसवेश्वरांची ज्ञानक्रांती’.

याचबरोबर अनुभव मंटपामध्ये शरण प्रा. मनोहर पटवारी,  शरण श्री. बस्वराजजी बागबंदे, शरण श्री. रमेश अण्णा अंबरखाने, शरण श्री. सिद्धेश्वर (मुन्ना) पाटील हे उपस्थित असतील.

सोमवारी दिनांक ५ जून रोजी सायंकाळी ५: ३० वाजता या मासिक अनुभव मंटपाचे आयोजन महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सर्वांनी या अनुभव मंटपासाठी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

फोटो सौजन्य:http://www.basavakalyana.comमुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

उदगीर येथे अनुभव मंटपाचे आयोजन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बसवकल्याणमध्ये १०-११ जून ला शिबिराचे आयोजन

बसव कल्याण (अभिषेक देशमाने): बसवकल्याण या जगतज्योती बसवेश्वर यांच्या क्रांतीभूमिच्या ठिकाणी येत्या १० व ११ जून ला शिबिराचे आयोजन करण्यात

Close