शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक: माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी): शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा आणि शेतमालाचे पडते भाव यामुळे शेतीमध्ये तयार झालेल्या आर्थिक समस्येचा विचार करता संवेदनशील पद्धतीने सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले.

सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाच्या ज्वलंत प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करताना कदम म्हणाले की संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींचा अवलंब या मुख्य मागण्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्यासाठी आवश्यक आहेत. यामध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण न आणता अत्यंत संवेदनशील पद्धतीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये शेतकरी सुखी राहिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट करून शेती संदर्भातली समस्याचे निराकरण लवकर करण्यात यावे असे आवाहन केले.

अत्यंत सविस्तरपणे शेतकरी संप व सरकारी धोरणे यावर डॉ. कदम यांनी भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. कदम यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांवर स्वतःची भूमिका स्पष्ट करणे सुरु केले आहे यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवत आहे.मुलांच्या-पालकांच्या- शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:

सेल्फहूड (info@selfhood.in) (9819179377)

 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक: माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

कडेगाव (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात भाजप  सांगली जिल्हा अध्यक्ष

Close