आता पेट्रोल-डिजेल चे भाव ठरणार रोजच्या रोज0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नवी दिल्ली: प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिजेल चे भाव रोजच्या रोज ठरवण्याचा निर्णय जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील पद्धतीनुसार सर्व विकसित देशांमध्ये पेट्रोल-डिजेल चे भाव रोज ठरवण्याची पद्धती आहे. अगदी तश्याच पद्धतीने येत्या १६ जूनपासून भाव ठरवले जाणार असल्याचे पत्रकांद्वारे सांगण्यात आले. भारतात दर १५ दिवसाला दर ठरवण्याची या आधीची पद्धत यामुळे मोडीत निघणार आहे. १ मे पासून ५ शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर नवी पद्धत वापरून तपासण्यात आली आहे, आता ती  सार्वत्रिक करण्यात येणार आहे. तेलाचे कमी-जास्त दर वापरून राजकीय मायलेज जमवण्याच्या राजकीय प्रवृत्तींना पण यामुळे चांगलाच आळा बसेल असे बोलले जात आहे.

या नवीन निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या पद्धतीने तेलाचे भाव आहेत त्यानुसार रोजचा दर ठरेल. या नव्या पद्धतीचा नक्की ग्राहकांवर कसा परिणाम होईल याविषयी सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.मुलांच्या-पालकांच्या- शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:

सेल्फहूड (info@selfhood.in) (9819179377)

 

 

 

आता पेट्रोल-डिजेल चे भाव ठरणार रोजच्या रोज

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक: माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम

कडेगाव (प्रतिनिधी): शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा आणि शेतमालाचे पडते भाव यामुळे शेतीमध्ये तयार झालेल्या आर्थिक समस्येचा विचार करता संवेदनशील पद्धतीने सरसकट कर्जमाफी

Close