शेतकरी कर्जमाफीला अखेर सरकारची मंजुरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई: सुरवातीपासून राजकीय कलगीतुरा आणि चळवळीतील गोंधळाने ग्रस्त असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज अखेर आनंदाचा दिवस उजाडला. अलीकडेच स्थापन केलेला उच्चाधिकार मंत्रीगट आणि सुकाणू समिती यांच्या आजच्या बैठकीनंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. फडणवीस सरकारने या निर्णयाचे श्रेय स्वतःकडेच ठेवण्याचे राजकीय कौशल्य या निमित्ताने दाखवून दिले.

याचबरोबर, उद्यापासून सर्व अल्पभूधारक शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र असतील.  शेतकरी आंदोलनाची सांगता झाल्याची घोषणा ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. अजूनही सर्व शेतकरी गटांकडून संप मागे घेतल्याची घोषणा झाली नसल्याने याबाबतीत काही अंशी संदिग्ध स्थिती राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

उरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी २५ जुलैपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकार तर्फे सांगण्यात आले आहे. स्वामिनाथन आयोगाच्या निर्णया संबंधी पंतप्रधान कार्यालयाचा पाठपुरावा करण्यात येणार असून त्याबाबतची कार्यनीती लवकरच ठरवण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल ३० हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातील. १ कोटीच्या जवळपास संख्या असणारे पाच एकरपेक्षा कमी शेती असणारे शेतकरी यामुळे कर्जमुक्त होणार आहेत.  या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.  जरी शेतकरी कर्जमाफीमुळे आर्थिक नियोजनावर मोठा भार पडणार असला तरी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कटीबद्ध असण्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश मधील योगी सरकारच्या शेतकरी कर्जमाफी घोषणेतून सुरु झालेल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाला अखेर नमूद करता येईल असे यश मिळाले आहे. सर्व देशाची उत्सुकता आता मध्य प्रदेश मधील शेतकरी आंदोलन काय वळण घेते व तिथले राज्य सरकार कोणता निर्णय घेते यावर लागून राहिले आहे.

महाराष्ट्रातील कर्जमाफीबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वत्र शेतकरी आनंदोत्सव साजरा करत आहेत.मुलांच्या-पालकांच्या-शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:

सेल्फहूड (info@selfhood.in) (9819179377)

 

 

 

शेतकरी कर्जमाफीला अखेर सरकारची मंजुरी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आता पेट्रोल-डिजेल चे भाव ठरणार रोजच्या रोज

नवी दिल्ली: प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिजेल चे भाव रोजच्या रोज ठरवण्याचा निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील पद्धतीनुसार सर्व

Close