​महिलांना ‘मायक्रो फायनान्स’चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते 0 मिनिटे

Print Friendly

कडेगांव (सागर वायदंडे): सांगली जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात शेकडो महिला अडकलेल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा राज्यभरात सुळसुळाट वाढलेला आहे, कर्जाचे वाटप केल्यावर १४ ते ४० टक्के व्याजदराची त्याची वसुली करुन जनतेला नाडणाऱ्या कंपन्यांची विशेष समिती मार्फत चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत त्या कंपन्यांची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत महिलांना मायक्रो फायनान्सचे हफ्ते भरु देणार नाही, असा इशारा जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिला.

आयडीएफ कडेगांव, ग्रामीण कुट्टा, स्पंदन, एकविटास, बुलडाणा बँक, ईरसेड संस्था, रत्नाकर बँक यांनी आपले जाळे कडेगांव तालुक्यात निर्माण केलेले आहे. या कंपन्यांनी महिलांवर ‘सर’ या नावाची दहशत निर्माण केलेली होती, परंतु आम्ही सतत होणाऱ्या मोर्च्याच्या माध्यमातुन ‘सर’ या नावाची दहशतच पुर्णपणे मोडीत काढली. सततची नापिकी दुष्काळ शेतमालाला भाव नसणे यामुळे छोटे शेतकरी व शेतमजुर यांची परस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्यात आजारपण, घरदुस्ती, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य  यासारख्या गोष्टींसाठी पैसा आणायचा कुठुन? अशा आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांना हेरुन मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातुन विनातारण कर्ज दिलेले आहेत. त्यामुळे या माध्यमातून कसल्याही प्रकारची महिलांची आर्थिक पिळवणुक होवू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
मुलांच्या-पालकांच्या-शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:

सेल्फहूड (info@selfhood.in) (9819179377)

 

Comments

comments

​महिलांना ‘मायक्रो फायनान्स’चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते 

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
घाटी मसाला ~ मीनानाथ

Close