भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही: उदयकुमार देशमुख, शौचालय दुरुस्तीच्या निकृष्ट कामाबद्दल विचारला जाब0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम): कडेगाव नगरपंचायतचे सध्या सुरु असलेल्या शौचालय दुरुस्तीचे काम ठरलेल्या पद्धतीने होत नसून ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे असे विरोधी पक्षनेते श्री. उदयकुमार माधवराव देशमुख यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी कोल्हे साहेब व नगरपंचायत इंजिनीअर पाचकवडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.  सदर कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काम निकृष्ट झाल्याने या कामाचे बील अधिकाऱ्यांनी काढू नये, असे त्यांनी सुचवले आहे, व यासंदर्भात न्याय्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

कडेगाव नगरपंचायतीने अलीकडेच मंजूर झालेल्या ठरावानुसार गावातील बरीच वर्षे बंद स्थितीत असलेल्या शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामध्ये मुख्याधिकारी कोल्हे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने शौचालय दुरुस्तीचे काम सुरु केले व आवश्यकतेनुसार मजबूत बांधकाम व पाईप लाईन तसेच पाण्याची सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाची स्थिती पाहता मूळ नियोजनापासून फारकत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. विरोधी पक्षनेते देशमुख यांनी या कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्यामध्ये प्लायवुड चे दरवाजे  कमी जाडीचे वापरणे, टॉयलेटची भांडी निकषाप्रमाणे न वापरणे अश्या प्रकारच्या गोष्टी दिसून  आल्या आहेत. यासंदर्भात कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही व प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे उदयकुमार देशमुख यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.

यांसदर्भात नगरपंचायत कडून अधिकृत वक्तव्य अजून प्राप्त झाले नाही त्यामुळे सत्ताधारी पक्ष व मुख्याधिकारी यांची काय भूमिका असेल याविषयी उत्सुकता आहे.ADVT

भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही: उदयकुमार देशमुख, शौचालय दुरुस्तीच्या निकृष्ट कामाबद्दल विचारला जाब

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘प्राथमिक’ चा प्रथम दिवस आरंभ…!!!

कडेगाव (प्रतिनिधी): सांगली परिषद प्राथमिक शाळा, कडेगाव येथे इयत्ता पहिलीतील विदयार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागंताचे स्वागत आज  सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष

Close