रस्त्याच्या दुरावस्थेने संतप्त जनतेने नगरसेवकांना चिखलात बसवले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम) : एका पावसातच शामरावनगरमध्ये रस्‍त्‍यांची दुरावस्‍था झाल्‍याने संतप्त नागरीकांनी आंदोलन करत  गुडघाभर दलदलीत ठिय्या देवून प्रखर निषेध केला. प्रतिवर्षीप्रमाणे रस्त्याची एका पावसातच दुरवस्था झाल्याने नागरीकांच्या रागाचा उद्रेक झाला. सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी चिखलात ठिय्या मारून आंदोलन सुरू केले.

आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी, अभिजित भोसले, स्वाभिमानीचे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे आदींनी या ठिकाणी धाव घेतली असता, नागरिकांनी त्‍यांना धारेवर धरले. तसेच नगरसेवकांना चिखलात ठिय्या मारायला लावला. यावरच न थांबता संतप्त  नागरीकांनी त्यांच्या कपड्यांना चिखल फासून निषेध व्यक्त केला. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनाही संपूर्ण उपनगरांमध्ये गुडघाभर चिखलातून दलदलीतून फिरवत पायपीट करून विदारक रूप दाखवून दिले.

या अनोख्या आंदोलनानंतर प्रभागाचे नगरसेवक नक्की काय कृती आखतात याविषयी सर्वांची उत्स्तुकता वाढली आहे.जाहिरात


रस्त्याच्या दुरावस्थेने संतप्त जनतेने नगरसेवकांना चिखलात बसवले

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही: उदयकुमार देशमुख, शौचालय दुरुस्तीच्या निकृष्ट कामाबद्दल विचारला जाब

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम): कडेगाव नगरपंचायतचे सध्या सुरु असलेल्या शौचालय दुरुस्तीचे काम ठरलेल्या पद्धतीने होत नसून ते निकृष्ट दर्जाचे

Close