कडेगावच्या हिंदु-मुस्लिम ऐक्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा : डॉ. विश्वजीत कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : रमजान महिना हा इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो.  या महिन्यात मुस्लीम बांधव रोजा (उपवास) करतात. रोजा सोडताना इफ्तारची प्रथा असते. यानिमित्त कडेगाव येथे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टी झाली. या इफ्तार पार्टीचे आयोजन कॉंग्रेसचे नेते, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक, दीपक भोसले यांनी केले होते.

यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव हे ऐतिहासिक गाव असून हे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. येथे प्रत्येक हिंदू बांधवांच्या सणात मुस्लिम बांधवांचा मान असतो तर मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक सणात हिंदू बांधवांचा मान असतो. मोहरम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अशा या गावाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. विश्वजित कदम आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, डॉ.जितेश कदम, जेष्ठ नेते गुलाम पाटील, सुरेश निर्मळ, रयत बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब शेख, कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम मुफ्ती साहेब, हाफिज अमन हसन, कडेगावचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील, नगरसेवक दिनकर जाधव, सागर सुर्यवशी, सुनील पवार, श्रीरंग माळी, प्रशांत जाधव, माजी सरपंच विजय शिंदे, अविनाश जाधव, सिराज पटेल, मुसा इनामदार, नासीर पटेल, असिफ तांबोळी, सादिक पिरजादे, राजेंद्र राऊत, फिरोज शेख, नईम पटेल, तोफिक तांबोळी, राजू बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.
जाहिरात


कडेगावच्या हिंदु-मुस्लिम ऐक्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा : डॉ. विश्वजीत कदम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नंदिवाले समाजातील गुणवंतांचा सत्कार संपन्न

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम) : कडेगाव तालुका नंदिवाले समाजाचे वतीने नंदिवाले समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा

Close