कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) : पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्र वगळता मुसळधार पडणाऱ्या पावसाने सगळीकडे उघडीप दिली आहे. गेल्या चार दिवसापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ कायमच आहे.  मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा चार फुटाने तर पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाचा जोर कायमच आहे.

शनिवारी रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर धूवादार पाऊस पडत आहे. गत चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 165 मिमी, नवजा येथे 237 मिमी तर महाबळेश्वर येथे 152 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभर पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहिला आहे. कोयनानगर येथे 90/675 मिमी , नवजा येथे 105/941 मिमी तर महाबळेश्वर येथे 40/745 मिमी पावसाची नोंद झाली.  पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी पातळीत 4 फूटाने  तर पाणी साठ्यात  2 टीएमसी ने वाढ झाली. कोयना धरणाची जलपातळी 2058.00 झाली आसून धरणात 21.15 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
क्रांती नगर वाचनालयामार्फत युवराज कदम यांचा सत्कार

 कडेगांव (सागर वायदंडे): येथील क्रांती नगर वाचनालयाच्या वतीने सोनहिरा सह. साखर कारखान्यांचे नुतन उपध्याक्ष युवराज नाना कदम यांची निवड झाल्याबदल

Close