कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने १००० मिमीचा टप्पा गाठला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात नवव्या दिवशी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधारेमुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक १४३७० क्यूसेक्स झाली आहे. यामुळे धरणाच्या जलपातळीत चोवीस तासात ३ फूटाने तर पाणीसाठ्यात १.५ टीएमसीने वाढ झाली आहे.

आठ दिवसात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने १००० मिमी ही मैजीक फिगर ओलांडली आहे. २१ जूनपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सरीवर सरी कोसळत असल्यामुळे ओहोटीकडे जात असलेल्या धरणातील पाणीसाठ्याने भरतीकडे प्रयाण सुरू केले आहे. गत चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १०१ मिमी तर नवजा येथे १५८ मिमी, महाबळेश्वर येथे १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. कोयनानगर येथे ५०/७४६ मिमी तर नवजा येथे ६५/१०१९ मिमी तर महाबळेश्वर येथे ४८/८२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या जलपातळी २०६१  फूट झाली असून धरणातील पाणीसाठा २२.४६ टीएमसी झाला आहे. आठ दिवसात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणाऱ्या पावसाने १००० मिमी  ही मैजीक फीगर ओलांडली सून यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ६ टीएमसीने वाढ झाली आहे.

१६ टीएमसी वरून हा पाणीसाठा २२.४६ टीएमसी वर येवून पोहचला आहे.
जाहिरात


 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने १००० मिमीचा टप्पा गाठला

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
श्रीमती आक्काताई पांडुरंग माळी यांचे निधन

कडेगाव : श्रीमती आक्काताई पांडुरंग माळी (वय ८७ ) यांचे दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्या शाहीर पांडुरंग प्रभू माळी यांचा

Close