कोयनेचा पाणीसाठा झाला ‘पावशेर’!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड): कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसा कमी होणाऱ्या पावसाचा जोर रात्री वाढत आहे. यामुळे धरणाच्या जलपातळीत 5 फूटाने तर पाणीसाठ्यात 3 टीएमसीने वाढ चोवीस तासात झाली आहे. धरणात  येणाऱ्या पाण्याची आवक 30,211 क्यूसेक्स आहे. कोयनेत  सध्या 25 % म्हणजे पावशेर पाणीसाठा झाला आहे.

गत चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर कमी होता. मात्र रात्री जोर वाढला आहे. कोयनानगर येथे 141 मिमी , नवजा 153 मिमी तर महाबळेश्वर येथे 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.

कोयनानगर येथे 65/1010 मिमी नवजा येथे 40/1268 मिमी तर महाबळेश्वर येथे 30/1055 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 30,211 क्यूसेक्स झाली आहे. यामुळे धरणाच्या जलपातळीत 5 फूटाने तर पाणीसाठ्यात 3 टीएमसी ने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2071.00 फूट झाली असून धरणात 27.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जाहिरात


 

 

कोयनेचा पाणीसाठा झाला ‘पावशेर’!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मुस्तफा सनदी ‘नरेंद्र मोदी विचारमंच’ च्या जिल्हा अध्यक्षपदी

सांगली (दिपक कोकणे): मुस्तफा सनदी यांची  'नरेंद्र मोदी विचारमंच' च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंचचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष

Close