विशेष लेख: सोशल मीडियाची पावर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

व्हाटसप, फेसबुक किंवा ट्विटर नक्की काय करू शकते याविषयी ग्रामीण भागात शंका असणे शक्य आहे. या शंका मुख्यतः पारंपारीक संवाद तंत्रावरील प्रगाढ श्रद्धेमुळे तयार होतात. ‘माणसाने माणसाशी समक्ष बोलल्याशिवाय खात्रीपूर्ण संवाद घडत नाही’ हे वास्तव आहे आणि अट्टल ग्रामीण जनता त्याशिवाय काहीच ऐकून घेत नाही हेही तितकंच खरंय. परंतु, यामुळे सोशल मिडियाचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना, सोशल मिडिया अश्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय-काय करू शकतो हेच यातून स्पष्ट होत जाते.

माहितीच्या क्रांतीमुळे आणि मोबाईल संबंधीच्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे अलीकडे व्हाटसप वरून संवाद साधण्याचा वेग वाढला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जनतासुद्धा अजिबात मागे नाही, फक्त यात वयोगटानुसार फरक आहे. एकमेकाशी समक्ष न बोलता व्हाटसपवर गप्पा मारणे हा प्रकार तरुण पिढी जास्त पसंत करते. थोडस खोलात जाऊन पहिले तर व्हाटसप वापरणारी जनता प्रामुख्याने नोकरदार, व्यावसायिक आणि तरुण तसेच मध्यमवर्गीय गटातली असल्याची समजून येईल. अगदी याच वर्गावर भिस्त ठेवून अलीकडे सर्व राजकीय पक्ष, सरकार, उत्पादक कंपन्या आणि विविध संघटना सोशल मीडियामधून कशापद्धतीने ग्राहकापर्यंत किंवा मतदारापर्यंत पोचता येईल याच्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. कारण या विशिष्ट वयाच्या व्यक्तींच्या स्वतःच्या कुटुंबांवरील प्रभाव प्रचंड आहे. सामाजिक पातळीवर सुद्धा तरुण गटांचे वर्चस्व वाढले आहे.

माहितीच्या अभ्यासाची गोष्ट म्हणून याकडे बघायचं झालं तर एक गोष्ट दिसेल की जिथ आपलं ‘लक्ष्य’ आहे तिथं आपल ‘लक्ष ’ पाहिजे हा अगदी सामान्य परंतु महत्वाचा मंत्र इथे प्रत्येकजण वापरत आहे. आणखी थोड खोलात जाऊन तपासलं तर आपल्याला दिसेल की निवडणूक काळात शेतात, घरात, लग्नात, मंदिरात, बाजारात अगदी मिळेल त्या ठिकाणी उमेदवार मतदारांना गाठण्याचा प्रयत्न करतात. तीच गोष्ट उत्पादकांची. पंढरीच्या वारीमध्ये किंवा गावातल्या वार्षिक जत्रांमध्ये आपली उत्पादने घेऊन तोंडी प्रचाराद्वारे विक्री करणारे बहाद्दर उद्योजकसुद्धा मोठ्या प्रमाणात असतातच की. म्हणजे ‘काळ बदलला आहे ’ वगेरे शब्दप्रयोग करणारे सुद्धा हे अजूनही मान्य करतील की ‘संवाद साधणे’ ही मुलभूत प्रक्रिया घडवून आणण्यासाठी प्रत्येकजण बाजारामधील ‘हॉट’ मार्ग वापरत असतो. फरक इतकाच आहे की पारंपारीक संवादाचे मार्ग त्यांच्या मर्यादांमुळे उत्पादक-ग्राहक किंवा राजकारणी-मतदार/नागरीक हा संवाद नियमित पद्धतीने घडवून आणू शकत नाहीत. आपल्या मतदारांसोबत किंवा ग्राहकांसोबत रोज संवाद साधणे यातून जे दीर्घ काळ टिकणारे नाते तयार होऊ शकते ते इतर पद्धतींमध्ये अवघड असत. आणि इथेच सोशल मिडिया त्याच्या विशेष शक्तीमुळे अत्यंत प्रभावीपणे सतत संवादाची प्रक्रिया तयार करतो.

अर्थात, सतत संवाद करणे आणि तेही व्हाटसप सारख्या सोशल मिडियावर म्हणजे यासाठी विशिष्ट कौशल्ये असणे आवश्यक आहे, हे अगदी उघड आहे. सतत तेच तेच सगळीकड दिसणारे मेसेज फोरवर्ड करणारा, मग तो कितीही मोठा शेटजी असो किंवा ग्रामपंचायत सदस्य असो, लगेच त्याचा ‘मीटर डाऊन’ करून टाकला जातो. सोशल मिडिया जेवढा माणसाला वर नेऊन ठेवतो तेवढाच खाली आणण्याचं कामसुद्धा करतो हे अलीकडचे काही राजकारणी निश्चित सांगू शकतील.

अगदी थोडक्यात या चर्चेला विराम द्यायचा झाला तर सध्या वारकरी वारीत आहे, शेतकरी शेतात आहे अन बाकीची जनता व्हाटसपवर आहे. आणि हीच जनता संख्येच्या प्रमाणात पहिले तर ‘ग्राहक’ आणि ‘मतदार’ म्हणून मोठ्या प्रमाणावर आहे. भारत प्रगती करणार या वल्गना याच तरुण लोकसंख्येच्या जीवावर केल्या जातात आणि त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे आपल्या ‘लक्ष्या’कडे पोचण्यासाठी सोशल मिडियाची शस्त्रे  वापरता येणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

पण हे शिकवायला कुणीच नाही त्यामुळे फक्त आलेला मेसेज नाव बदलून फोरवर्ड करणे सुरुय. बाकीच्यांचं ठीकाय पण आता ‘इलेक्शन-फिलेकक्षण’ च्या नादात गुरफाटलेल्या आमच्या युवा नेत्यांचं काय? प्रकरण अवघड होत चाललय.

सांगून पटत नाय ना ? मग व्हाटसप करुका डिटेल मध्ये ?

लेखक: मॅक्झिम मिडीया फिचर सर्विसेस. सर्वाधिकार सुरक्षित, २०१७.

www.maxim-media.inजाहिरातजाहिरात

 

विशेष लेख: सोशल मीडियाची पावर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोयनेचा पाणीसाठा झाला ‘पावशेर’!

कोयनानगर (विजय लाड): कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसा कमी होणाऱ्या पावसाचा जोर रात्री वाढत आहे. यामुळे धरणाच्या जलपातळीत 5 फूटाने

Close