उल्हासनगरमधील शिक्षणक्षेत्रात योगदान करणारे लेंगरेकर यांच्या कार्याचा गौरव0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी): कडेगावचे सुपुत्र व कार्यक्षम प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रसिद्ध असलेले उल्हासनगरचे उपायुक्त मा. जमीर लेंगरेकर यांची पनवेल इथे उपायुक्तपदी नियुक्ती झाली. नवीन कार्यभार स्वीकारण्यापूर्वी आज त्यांच्या उल्हासनगर मधील सहकाऱ्यांनी निरोपाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी मा. आयुक्त व इतर पालिका कर्मचाऱ्यांनी मा. लेंगरेकर यांचे सत्कार करत आभार मानले.

२२ डिसेंबर २०१४ ते १ जुलै २०१७ पर्यंत उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय सेवा करून ते आजपासून पनवेल इथे नवा कार्यभार स्वीकारत आहेत. मुळचे कडेगावचे असणारे जमीर लेंगरेकर महाराष्ट्रातील नगर विकास विभागामध्ये कार्यक्षम अधिकारी म्हणून नावाजले जातात.

 

उल्हासनगर मधील पालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये मा लेंगरेकर यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याने उल्हासनगरचे नागरीक, समाजसेवक तसेच शिक्षण क्षेत्रातील मंडळी योगदानाबद्दल कृतज्ञ आहेत.जाहिरात

 

उल्हासनगरमधील शिक्षणक्षेत्रात योगदान करणारे लेंगरेकर यांच्या कार्याचा गौरव

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जमीर लेंगरेकर यांची पनवेलच्या उपायुक्तपदी नियुक्ती

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावचे सुपुत्र व धडाडीच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रसिद्ध असलेले उल्हासनगरचे उपायुक्त मा. जमीर लेंगरेकर यांची आता पनवेल इथे

Close