कोयना धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) : दमदार पावसासाठी अनुकूल असणाऱ्या नक्षत्राच्या आगमनामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणाच्या जलपातळीत चोवीस तासात दोन टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गत चोवीस तासात कोयना पाणलोट क्षेत्रात कोयनानगर येथे ९३ मिमी नवजा येथे १११ मिमी महाबळेश्वर येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी नक्षत्र बदलल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. कोयनानगर येथे ६०/१३९० मिमी नवजा येथे ७५/१५८९ मिमी महाबळेश्वर येथे ४६/१३३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक १३२८२ क्यूसेक्स आहे. धरणाची जलपातळी २०८५  फूट असून धरणात ३४.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जाहिरात


जाहिरात

कोयना धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उल्हासनगरमधील शिक्षणक्षेत्रात योगदान करणारे लेंगरेकर यांच्या कार्याचा गौरव

कडेगाव (प्रतिनिधी): कडेगावचे सुपुत्र व कार्यक्षम प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रसिद्ध असलेले उल्हासनगरचे उपायुक्त मा. जमीर लेंगरेकर यांची पनवेल इथे उपायुक्तपदी नियुक्ती

Close