‘अभिजित कदम प्रबोधिनी’च्या बालम मुलाणी यांची सैन्यदलात निवड0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: भारती विद्यापीठ अंतर्गत ‘अभिजीत कदम प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कडेगाव’ मधील बालम आब्बास मुलाणी ह्या उमेदवाराची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली असून त्याचा सत्कार व कौतुक भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे मा. कुलपती व आमदार डॉ. पतंगरावजी कदम यांच्या हस्ते पार पडला.

मुळचा कडेपूर (ता.कडेगाव)  येथील असणारा बालम याची मध्यप्रदेश येथे निवड झाली आहे. बालम मुलाणी ‘अभिजीत कदम प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ येथे तयारी व सराव करत होते. सदर प्रबोधिनी  १ ऑगस्ट २०१६ पासून कार्यरत असून सध्या या केंद्रात जिल्ह्यातील अनेक होतकरू व महत्वकांक्षी विद्यार्थी-विद्यार्थिनी मार्गदर्शन घेत आहेत.

शहरी अभ्यासकेंद्रांमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा कडेगाव परीसरात आणि घरापासून जवळ उपलब्ध झाल्याने कडेगांव-पलूस भागातील प्रशासकीय सेवांमध्ये करीयर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची चांगली सोय झाली आहे त्यामुळेच प्रबोधिनी अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवती मध्ये लोकप्रिय झाली आहे. सध्या नवीन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी तात्काळ प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन केंद्राचे समन्वयक श्री. नितीन माने यांनी केले आहे.जाहिरात


जाहिरात

‘अभिजित कदम प्रबोधिनी’च्या बालम मुलाणी यांची सैन्यदलात निवड

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पलूसला काँग्रेसची आज बैठक

पलूस : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पलूस तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्याची बैठक माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम, ज्येष्ठ

Close