ये रे ये रे पावसा ! कोयना धरणाची आर्त हाक !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोयनानगर (विजय लाड) :  ५ जुलैपासून मुसळधार पावसासाठी प्रतीचेरापूंजी अशी ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. यामुळे भरतीकडे आगेकूच करणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाढ ठप्प झाली आहे. कोयना धरणात केवळ ३६ % पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी कोयना धरणात १२ टीएमसी पाणीसाठा जादा आहे. पावसाच्या पहिल्याच टप्प्यात धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला असला तरी गायब झालेला पाऊस पुनरागमन कधी करणार, यावरच कोयना धरणाचे व राज्यातील जनतेचे भवितव्य आवलंबून आहे.

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात गत महिन्याच्या १५ जूनपासून मुसळधार पावसाने आगमन केले होते. धरणात केवळ १६  टीएमसी पाणीसाठा होता. धरणातील पाण्यावर चालणारे पश्चिमेकडील वीज प्रकल्प बंद होते. केवळ पंचवीस दिवसात १६  टीएमसी पाणीसाठ्याची वाढ कोयना धरणात झाली आहे. सध्या कोयना धरणाची जलपातळी २०९०.०९ फूट असून धरणात ३८.०२ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणातील जलपातळी २०१७०.०५  फूट होती तर धरणात२६.८४ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी पावसाच्या पहिल्याच टप्प्यात मुसळधार पावसामुळे २४. ५५  टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे कोयना धरण ३६ % भरले आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पावसाचा जोर कमी आसला तरी गतवर्षीच्या तुलनेने समाधानकारक पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 1,443 मिमी ,नवजा येथे 1,648 मिमी तर महाबळेश्वर येथे 1,411 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.गतवर्षी याच दिवशी कोयनानगर येथे 1,324 मिमी नवजा येथे 1,644 मिमी तर महाबळेश्वर येथे 1,399 मिमी पाऊसाची नोंद झाली होती.पावसाची आकडेवारी जवळपास शंभर मिमीने कमी असली तरी धरणातील पाणीसाठा 12 टीएमसीने जादा होता. पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. यामुळे धरणात पाण्याची वाढ ठप्प आहे.

 जाहिरात

ये रे ये रे पावसा ! कोयना धरणाची आर्त हाक !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना

कडेगाव (दिपक कोकणे): ​ नगरपंचायत हद्दिमधील सर्व दारु दूकाने बंदी साठी कडेगाव मधील सर्व महिलांच्या सहीचे पत्र उत्पादन शुल्क जिल्हा

Close